शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पेठांमध्ये अघोषित पाणीकपात

By admin | Updated: December 24, 2014 01:33 IST

स्वारगेट चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या खोदकामामुळे शहरातील मध्यवर्ती पेठांना पाणीपुरवठा करणारी २४ इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा फुटली.

पुणे : स्वारगेट चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या खोदकामामुळे शहरातील मध्यवर्ती पेठांना पाणीपुरवठा करणारी २४ इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने तातडीने हाती घेतले असले, तरी त्यासाठी आणखी वेळ जाणार असल्याने उद्या (बुधवारी) या जलवाहिनीवर अवलंबून असणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.स्वारगेट चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून खांबासाठी खोदकाम सुरू आहे. या परिसरातून शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या जात असल्याने हे काम करताना, काळजी घेण्याची विनंती महापालिकेकडून पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारास वारंवार करण्यात आली आहे. हे पत्र दिले असतानाही यापूर्वी तीन वेळा या ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. मात्र, आज दुपारी पुन्हा तोच प्रकार घडला. दुपारी तीनच्या सुमारास खोदकाम सुरू असताना, भवानी पेठ परिसर पेठांच्या प्रमुख भागास पर्वती जलकेंद्रातून पाणीपुरवठा करणारी २४ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली. या वेळी जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू असल्याने या ठिकाणी काही सेकंदातच पाण्याचे उफळे सुरू होऊन अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण चौकात गुडघाघर भर पाणीसाचले. (प्रतिनिधी)