शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची अघोषित ‘आधार’सक्ती

By admin | Updated: July 23, 2015 04:28 IST

गॅस सिलिंडर सबसिडी पाहिजे, आधार कार्ड द्या... रेशनिंगचे धान्य पाहिजे, आधार कार्ड द्या... एसटीच्या पाससवलतीसाठी आधार आवश्यकच...

सुषमा नेहरकर-शिंदे, पुणेगॅस सिलिंडर सबसिडी पाहिजे, आधार कार्ड द्या... रेशनिंगचे धान्य पाहिजे, आधार कार्ड द्या... एसटीच्या पाससवलतीसाठी आधार आवश्यकच... शिष्यवृत्ती पाहिजे आधारचा पुरावा जोडा... बँक खाते सुरू करताय आधार द्या... पासपोर्ट काढता आधार जोडा... अशा एक ना अनेक कारणांसाठी सध्या नागरिकांकडे वेगवेगळ््या यंत्रणांकडून आधार सवलत कार्डची मागणी केली जात आहे. परंतु, आजही पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल १९ लाखांपेक्षा अधिक लोकांची आधार नोंदणी झाली नााही. तर १० ते १५ टक्के लोकांची नोंदणी होऊनही त्यांना आधार मिळालेले नाही. यामुळे ‘आधार’ नसलेल्या नागरिकांना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही योजनांसाठी अथवा ओळखीचा पुरावा म्हणून शासनाला आधार सक्ती करता येणार नसल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशानंतरदेखील शासनाच्याच विविध यंत्रणांमार्फत ‘आधार’ लिंकिंगची मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात गॅस सिलिंडरची सबसिडी जमा करण्यासाठी, बोगस रेशनकार्ड धारकांना आळा घालण्यासाठी, दुबार व बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आधार लिंक करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे गॅस, रेशनिंगचे धान्य घेणाऱ्या सर्व नागरिकांना आधार देणे बंधनकारक झाले आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या एसटीच्या सवलत पाससाठी आधारची मागणी केली जाते. विद्यार्थ्यांना वेगवेगळ््या विभागाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्त्यांचे पैसे देण्यासाठी, निराधार, वृद्ध, अपंग व्यक्तींना मिळणारे मानधन देण्यासाठी, रोजगार हमीवर काम करणाऱ्या कामगारांना, शासकीय कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यासाठी, बँकेत नवीन खाते सुरू करणे, पासपोर्ट काढणे, शाळेत प्रवेश घेणे आदी सर्वच कारणांसाठी आधार कार्डची मागणी केली जात आहे.