शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद विसरून निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: July 25, 2015 04:56 IST

: हवेली तालुक्यातील पूर्व भागामधील अष्टापूर येथील ग्रामपंचायत २०१५ ची निवडणूक बिनविरोध करण्यास स्थानिक नेत्यांना यश आले आहे

पिंपरी सांडस : हवेली तालुक्यातील पूर्व भागामधील अष्टापूर येथील ग्रामपंचायत २०१५ ची निवडणूक बिनविरोध करण्यास स्थानिक नेत्यांना यश आले आहे. सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी मतभेद विसरून ती निवडणूक बिनविरोध केली. विशेष म्हणजे या गावचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. गावातील सर्व पुढाऱ्यांनी एकत्र बसून आपापसांतील मतभेद विसरून गावची निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. अष्टापूर ग्रामपंचायतीसाठी एकूण चार प्रभाग असून यामध्ये छाया प्रकाश जगताप, नितीन अंकुश मेमाणे, लक्ष्मी संदीप मलाव, सुनंदा कांतिलाल कोतवाल, सुभाष चंद्रकांत जगताप, रुक्मिणी सुरेश कोतवाल, आत्माराम बबन कोतवाल, चंद्रभागा दिलीप कोतवाल, दत्तात्रय शांताराम कोतवाल, सुनीता संतोष कोतवाल, संतोष भाऊसाहेब निकाळजे यांचा बिनविरोधमध्ये समावेश आहे. अष्टापूर ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी एकूण ३० अर्ज आले होते. त्यापैकी तब्बल १९ जणांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध करणे सोपे झाले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुणे मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जगताप, हवेली पंचायत समिती माजी सदस्य सुभाष जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, श्रीहरी कोतवाल, सुखदेव कोतवाल, सूर्या ग्रुपचे चेअरमन बाळासाहेब भोसले, माजी सरपंच रमेश कोतवाल, अण्णासाहेब कोतवाल, शामराव कोतवाल, तयाजी जगताप, अरविंद कोतवाल, ज्ञानोबा कोतवाल, पांडुरंग कोतवाल, आबा कोतवाल, कोंडिबा कोतवाल, बाजीराव कोतवाल, विकास कोतवाल, सुभाष कोतवाल, पंढरीनाथ कोतवाल, शिवाजी कोतवाल, राजेंद्र कोतवाल, कैलास कोतवाल, रामदास कोतवाल, अण्णासाहेब कोतवाल आदींनी प्रयत्न केले. सासवड : पुरंदर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत निवडणुकांमधील बेलसर, खानवडी, वाळुंज, केतकावळे व पोंढे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. याबरोबरच २६ ग्रामपंचायतींमधील ६६ जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे एकूण ५७ ग्रामपंचायतींच्या एकूण ४४१ जागांसाठी मतदान होईल. या प्रक्रियेमध्ये एकूण १,६७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर ५५९ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे एकूण १,००६ जणांचे अंतिम अर्ज राहिले असून, ४ आॅगस्ट रोजी मतदान घेण्यात येईल, अशी माहिती पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी १३ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. १३ ते २० जुलै या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. एकूण ६२ ग्रामपंचायतींसाठी ५४८ उमेदवार निवडण्यात येणार होते. यासाठी एकूण २०६ प्रभाग निश्चित करण्यात आले होते. स्त्री मतदार ५५,१८७ व पुरुष मतदार ६०,१३२ असे एकूण मतदार १,१५,३१९ इतके होते. अर्ज दाखल करण्याच्या काळात एकूण १,६७३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. तसेच अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १,६७३ पैकी ५५९ जणांनी तडजोड करून आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकूण १,००६ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले.एकूण ६२ ग्रामपंचायतींपैकी बेलसर, खानवडी, वाळुंज, केतकावळे, पोंढे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ५७ ग्रामपंचायतीं साठी मतदान घेण्यात येईल. त्याचप्रमाणे एकूण ६२ ग्रामपंचायतींमधील ५ बिनविरोध ग्रामपंचायती धरून ५४८ पैकी ४४१ जागांसाठी मतदान घेण्यात येईल, अशी माहिती संजय पाटील यांनी दिली.