शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेडिअम परिसरात अस्वच्छता

By admin | Updated: April 25, 2016 01:15 IST

गहुंजे येथील क्रिकेट स्टेडिअम परिसरात सामन्याच्या वेळी अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असून, त्याचा त्रास शेतकरी आणि ग्रामस्थांना होत आहे.

देहूरोड : गहुंजे येथील क्रिकेट स्टेडिअम परिसरात सामन्याच्या वेळी अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असून, त्याचा त्रास शेतकरी आणि ग्रामस्थांना होत आहे.शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या नवव्या सत्रातील सामन्यांसाठी विविध कामांसाठी शेकडो कामगार आले होते. प्रेक्षकांसाठी पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ विक्रीसाठी विविध भागांतून आलेले विक्रेते व त्यांचे कामगार आले होते. त्यांनी गेल्या तीन दिवसांत स्टेडिअम नजीकच्या गहुंजे परिसर, शेतात, पायवाटा व लहान-मोठ्या रस्त्यांवर प्रातर्विधी उरकल्याने सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ पुरते त्रस्त झाले असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. गहुंजेतील निर्गुण बोडके, आनंदा बोडके, सचिन बोडके, तसेच अन्य काही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार गहुंजेतील स्टेडिअमवर पहिला सामना शुक्रवारी झाला. या सामन्यासाठी परिसरात विविध भागात विविध ठिकाणी करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था व त्यासाठी आणण्यात आलेली जनरेटर सुविधा असणारी सुमारे पन्नास वाहने, त्यावरील सुमारे दोनशे कामगार, सामन्यांसाठी येणाऱ्या हजारो प्रेक्षकांसाठी सामन्याच्या दरम्यान पाण्याच्या बाटल्या व खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते, तसेच त्यांचे कामगार, सामन्यांच्या वेळी स्टेडिअममध्ये विविध कामांसाठी आणलेले सुमारे तीन-चारशे कामगार, त्यांचे कुटुंबीय यांना स्टेडिअम परिसरात मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे सर्वांनी गहुंजे गावाच्या परिसरातील गावठाणाकडे व शेताकडे जाणारे सर्व लहान-मोठे रस्ते, पायवाटांवर तसेच शेतात प्रातर्विधी उरकल्याचे ओंगळवाणे चित्र दिसत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून, शेतकऱ्यांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. एखाद- दुसऱ्या शेतकऱ्याने कामगार व विक्रेत्यांना मज्जाव करीत हाकलून लावण्याच्या प्रयत्न केला असता, संख्येने अधिक असलेले महिला व पुरुष कामगार शेतकऱ्यांवर गुरकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. याबाबत स्टेडिअम व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, येथील देखभाल पाहणारे अभियंते कुदळे यांनी मला काहीही माहिती नाही, असे सांगितले. त्यांना पुन्हा संपर्क करून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मोबाइल उचलला नाही. (वार्ताहर)