शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उलगडली रंगांची दुनिया!

By admin | Updated: February 19, 2016 01:41 IST

फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद बागडणारी चिमुरडी... आपापल्या भावविश्वातील चित्र रंगवून त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती... श्रीकृष्णाच्या लीला तसेच दसरा

पुणे : फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद बागडणारी चिमुरडी... आपापल्या भावविश्वातील चित्र रंगवून त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती... श्रीकृष्णाच्या लीला तसेच दसरा, दिवाळी, ईद, नाताळसारख्या सणांचे महत्त्व, गावातील जत्रा, खेळणी असे वैविध्य, तर दुसरीकडे हरिण, अस्वल, घोडा, झेब्रा, घार, बदक, कावळा, चिमणी, पोपट असे पशू-पक्षी इत्यादींनी राजा रविवर्मा आर्ट गॅलरीतील वातावरण चित्रमय झाले होते.सिंहगड रस्त्यावरील कलावती आर्ट क्लासतर्फे ‘विंग्ज आॅफ आर्ट’ हे रंगांची उधळण करणारे आणि चिमुरड्यांच्या कल्पकतेचे पंख विस्तारणारे वार्षिक चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे. मिनी केजीपासून दहावीतील चित्रकारांनी साकारलेली विविध विषयांवर चित्रे येथे पाहायला मिळत आहेत. आपल्या कल्पनेतील विश्वाला वास्तवाशी जोडून सुंदर चित्रे साकारण्याची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली आहे. संस्थेचा सर्वांत छोटा चित्रकार ओजस मते याच्या हस्ते गुरुवारी चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दर वर्षी चित्रकृतींसाठी विशिष्ट विषयाची निवड केली जाते. या वर्षी फुले आणि फुलपाखरे हा विषय निवडण्यात आला आहे. प्रदर्शनाच्या दर्शनी भागात फुलपाखराच्या नक्षीमध्ये विद्यार्थ्यांचे फोटो लावून कल्पकतेची झलक दिसते. हे प्रदर्शन १८ व १९ फेब्रुवारी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले आहे. (प्रतिनिधी)