शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अनधिकृत शाळा पुन्हा फोफावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 02:13 IST

दर वर्षी अनधिकृत शाळांच्या संख्येत वाढ होत आहे. अनधिकृत संस्थाचालकांनी मनमानी पद्धतीने शासनमान्यता नसताना शाळा सुरू केल्याने अनधिकृत शाळांना आळा बसणे आवश्यक आहे

चिंचवड : दर वर्षी अनधिकृत शाळांच्या संख्येत वाढ होत आहे. अनधिकृत संस्थाचालकांनी मनमानी पद्धतीने शासनमान्यता नसताना शाळा सुरू केल्याने अनधिकृत शाळांना आळा बसणे आवश्यक आहे. विद्यार्थी व पालकही याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अनधिकृत शाळा फोफावल्या आहेत.शिक्षण मंडळ प्रशासनाच्या अहवालाप्रमाणे सध्या १८ शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. गत वर्षी अनधिकृत १४ शाळा होत्या. या शाळांची कोणतीही कागदोपत्री नोंद नाही. शिक्षण मंडळ पर्यवेक्षकांनी केलेल्या पाहणीतून या शाळा अनधिकृत ठरविण्यात आल्या आहेत. ज्ञानराज प्राथमिक विद्यालय कासारवाडी, इन्फंट जिझस प्रायमरी कासारवाडी, एम. एस. स्कूल फॉर किड्स सांगवी, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव, मॉडर्न पब्लिक स्कूल रहाटणी, चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर, बालविकास इंग्लिश स्कूल गणेशनगर, पुनरुत्थान गुरूकुलम केशवनगर चिंचवड, एंजल्स हायस्कूल पिंपळे निलख, दर्शन अ‍ॅकॅडमी एम्पायर इस्टेट चिंचवड, (कै.) आनंदीबाई वाघेरे प्राथमिक पिंपरी वाघेरे, ब्रिलियंट सिटी पब्लिक स्कूल धावडेवस्ती, मास्टर केअर इंग्लिश स्कूल भोसरी, ज्ञानसागर इंग्लिश स्कूल दिघी, सिद्धिविनायक पब्लिक स्कूल इंग्रजी, सिद्धिविनायक पब्लिक स्कूल मराठी, कमल प्रतिष्ठान माऊंड लिटेरा झी स्कूल या शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. (वार्ताहर)कारवाई : अनधिकृत शाळांना दंडअनधिकृत शाळा मान्यतेशिवाय चालू राहिल्यास प्रतिदिवशी दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई आहे. एखाद्या शाळेची मान्यता काढून घेतल्यासही पुन्हा शाळा सुरू राहिल्यास एक लाख रुपये दंड भरण्याची तरतूद आहे. तसेच, अनधिकृत शाळा चालविणाऱ्या संस्थाचालकाविरोधात फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. शाळा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय सुरू करता येत नाही. अशा शाळा सुरू राहिल्याने कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची फसवणूक होते. विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती असते.शहरात खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय व अनधिकृत मिळून अशा जवळपास ६११ शाळा आहेत. नव्याने शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा मान्यता असणे आवश्यक आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापपर्यंत एकाही शाळेवर कारवाई केलेली नाही. शाळांना दर वर्षी फक्त शाळा बंद करण्याची नोटीस पाठविली जाते. प्रशासनाने ठोस पावले न उचलल्याने शाळांचेही फावले आहे. शाळा मान्यतेकडे काणाडोळा करत शाळांची विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी सुरू आहे.महाराष्ट्र शासन शिक्षण संचालकाच्या वतीने शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळांची यादी जाहीर करण्यात यावी. अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. अन्यथा शाळांवर कारवाई करण्यात येईल. संबंधित शाळा ३० जूननंतर सुरू राहिल्यास यासंबंधीचा अहवाल शिक्षण संचालक यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात यावा. तसेच अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या शाळा व्यवस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे आदेश आहेत. अनधिकृत शाळांबाबत शिक्षण उपसंचालकांशी चर्चा करावयची आहे. त्याबाबत अद्यापपर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही. यापूर्वी पर्यवेक्षकांनी शाळांचे सर्वेक्षण केले आहे. यूडायसच्या अहवालामधून अनधिकृत शाळा काढण्यात आलेल्या आहेत. उपसंचालकांशी बोलणे झाल्यानंतरच निर्णय देण्यात येईल. - बी. सी. कारेकर, शिक्षण प्रशासन अधिकारी