शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या तलावाचा अनाधिकाराने ताबा

By admin | Updated: May 4, 2017 02:54 IST

धनकवडीमधील तीन हत्ती चौकातील महापालिकेच्या मालकीच्या विष्णू ऊर्फ अप्पासाहेब जगताप तरणतलाव व व्यायामशाळेचा

पुणे : धनकवडीमधील तीन हत्ती चौकातील महापालिकेच्या मालकीच्या विष्णू ऊर्फ अप्पासाहेब जगताप तरणतलाव व व्यायामशाळेचा महापालिकेत पैसे जमा न करताच ताबा घेण्यात आला. राजकीय वरदहस्तातून हा प्रकार झाला असून महापालिकेच्या मालमत्ता विभागाने आता संबधितांकडे १४ लाख ४० हजार रुपयांच्या वसुलीसाठी तगादा सुरू केला आहे. अजून पैसे जमा झाले नसले तरी तलावाचा ताबा संबधिताकडेच असून त्याचा बिनदिक्कतपणे व्यावसायिक वापर केला जात आहे. दरमहा १ लाख रुपये २० हजार रुपये भाडे याप्रमाणे गुंजाळ यांची निविदा मंजूर झाली. नियमाप्रमाणे त्यांनी ६ महिन्यांचे भाडे अनामत रक्कम म्हणून जमा करणे आवश्यक होते. २६ जून २०१६ रोजी त्यांनी ही रक्कम जमा केली असे मालमत्ता विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांना १ आॅगस्ट २०१६ रोजी ताबा देण्यात आला. त्यानंतर मात्र गुंजाळ यांनी काहीही पैसे जमा केलेले नाही. आॅगस्ट २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीचे १० लाख ८० हजार रुपये त्यांनी थकवले. तसेच ३० जून २०१६ रोजी ३ महिन्यांचे भाडे आगाऊ जमा करण्याबाबत कळवल्यानंरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.महापालिकेकडे पैसे जमा नाहीत, मात्र तलावाचा ताबा गुंजाळ यांच्याकडे असेच आॅगस्ट २०१६ पासून सुरू आहे. गुंजाळ यांच्याकडे एकूण १४ लाख ४० हजार रुपयांची वसूली निघते आहे. ती जमा होत नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर महापालिकेचा करारनामाही झालेला नाही. तो व्हावा यासाठी रक्कम जमा करावी, म्हणून मालमत्ता विभागाने आता त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान या तलावाचा व्यावसायिक वापर सुरू आहे. तिथे रितसर पोहण्याचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतो. तसेच शुल्क आकारून पोहणेही सुरूच आहे. पत्रव्यवहारातून माहिती उघहएकूण १४ लाख ४० हजार रुपयांच्या वसुलीसाठी महापालिकेने तलाव ताब्यात असलेल्या अभिजित गुंजाळ यांना नोटीस बजावली आहे. महापालिकेने हा तलाव चालवण्यासाठी म्हणून जाहिरात दिली होती. गुंजाळ यांच्यासह आणखी काही जणांनी निविदा दाखल केली. सन २०१६ मध्ये गुंजाळ यांची निविदा मंजूर झाली. त्यांनी नियमाप्रमाणे सर्व अटीशर्ती पूर्ण करून त्यानंतरच तलावाचा ताबा घेणे गरजेचे होते. मात्र तसे काहीही न करता त्यांनी तलावाचा ताबा घेतला व महापालिकेनेही तो दिला, असे उपलब्ध पत्रव्यवहारावरून दिसते आहे.तलाव माझ्या नावावर घेतला असला तरी प्रत्यक्षात तो दुसरी व्यक्ती चालवत आहे व माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेच्या वसुलीच्या नोटीशीनंतर सर्व पैसे जमा करण्यात आलेले आहेत. - अभिजित गुंजाळमहापालिकेची मालमत्ता भाडेतत्त्वावर घ्यायची असेल तर त्याचे अनेक नियम आहेत. महापालिकेचे आर्थिक नुकसान करून ही मालमत्ता दिली गेली आहे, असे स्पष्ट दिसते आहे. स्थानिक नगरसेवकांना अंधारात ठेऊन प्रशासन अशा गोष्टी करणार असेल तर आम्हाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल. प्रशासनाने राजकीय दबावातून अशा गोष्टी करू नयेत.- आबा बागूल, स्थानिक नगरसेवक