शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वडगावशेरीत अनधिकृत फलकांचे पीक

By admin | Updated: December 22, 2016 02:27 IST

महापालिकेची निवडणुकीची येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांनी

चंदननगर : महापालिकेची निवडणुकीची येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी वडगावशेरी, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर भागांत फलकबाजी सुरू केली आहे. निवडणुकीतील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने फलकांची संख्याही तेवढीच असल्याने परिसर मात्र विद्रूप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.नगररस्ता आकाशचिन्ह विभागही कारवाई करून फलक हटवत आहे. मात्र एकाचा फलक काढला, की लगेच दुसऱ्याचा फलक झळकतो. त्यामुळे फलक लावण्याऱ्यांसमोर नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.अनधिकृत फलक लावू नये व शहर विद्रूप करू नये, असे न्यायालयाचे आदेश असताना फलक लावले जात आहेत. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने चौकांना, पथदिव्यांना जास्त महत्त्व आले आहे. चंदननगर छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा, खराडी चौक, बायपास चौक, विमाननगर चौक, रामवाडी हायत, टाटा गार्डरूम, संघर्ष चौक, द्वारका गार्डन, गणेशनगर, आनंदपार्क, वडगावशेरी गावठाण, छत्रपती शिवाजीमहाराज उद्यान चौक वडगावशेरी, कल्याणीनगर अ‍ॅडलॅब चौक, विमाननगर दत्तमंदिर चौक, गणपती चौक, सिम्बॉयसिस विमाननगर या सर्व चौकांसह परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर पथदिव्यांवर फलक लावले जात आहे.दिवाळीपासून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक बेकायदा फलक काढण्यात आले आहेत. कारवाई होऊनही काहीही परिणाम फलक लावणाऱ्यांवर झालेला नाही. गेल्या तीन दिवसांत तब्बल १२०० बेकायदा फलक काढण्यात आले आहेत. (वार्ताहर)