शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर शहरात खुलेआम अवैध धंदे

By admin | Updated: May 20, 2017 05:05 IST

राजगुरुनगर शहरात अवैध मटका व्यवसाय व गावठी दारूधंदा खुलेआम सुरू आहे. पोलीस सोयीस्करपणे काणाडोळा करीत आहे. सगळीकडे मटका, दारूधंदे

- राजेंद्र मांजरे । लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : राजगुरुनगर शहरात अवैध मटका व्यवसाय व गावठी दारूधंदा खुलेआम सुरू आहे. पोलीस सोयीस्करपणे काणाडोळा करीत आहे. सगळीकडे मटका, दारूधंदे बंद आहे; मात्र राजगुरुनगर शहरात बाजार समिती आवारात व लगत हे धंदे मात्र तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मटका व्यवसाय व गावठी दारू बंद करण्याची मागणी राजगुरुनगर शहरातील नागरिकांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत दारूविक्रीला बंदी घालण्यात आल्याने कायदेशीर बिअरबारमधील मिळणारी दारूविक्री एक एप्रिलपासून बंद झाली; मात्र छुप्या पद्धतीने अवैध पद्धतीने दारूविक्रीचा काळाधंदा तालुक्यात जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक देशी व विदेशी दारूविक्रीचा धंदा करणाऱ्या मंडळींनी छुप्या पद्धतीने चढ्या दराने दारू विक्री करीत आहे.राजगुरुनगर शहरात खुलेआम मटका व्यवसाय व गावठी दारूची विक्री होत आहे. पोलीस आणि मटकाचालक यांच्या संगनमताने हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. चाकण आणि राजगुरुनगरसह कडूस, चास, आळंदी परिसरात मटका व्यवसाय चालत असल्याचे सांगितले जातेय. मटक्याचा जुगार खेळणारांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढल्याने या व्यवसायाची चलती आहे. तसेच, दारू व जुगर मटका यामुळे अनेक घरांत कलह वाढले आहेत, झटपट पैसे मिळविण्याच्या हेतून तरुण आणि प्रतिष्ठित नागरिक या व्यवसायाकडे वळले आहेत. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या खेड कृषी उ. बाजार समितीच्या मागील बाजूस तसेच आवारात मटका व्यवसाय सुरू असून गावठी दारू विक्री फुग्यात मिळत आहे. झाडाखाली खुर्ची टाकून मटक्याचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे.तसेच एक गावठी दारूविक्रेता दुचाकीवर चांडोली येथून आणून दिवसभर गावठी दारू प्लॅस्टिक पिशवीत आणून (फुगा) सर्रास विक्री करत आहे. यामध्ये रोज लाखो रुपायांची उलाढाल होते. बाजार समितीच्या आवारात कायम तळीरामाचा अड्डा असतो. या परिसरात सर्वत्र रिकाम्या दारूच्या बाटल्या व गावठी दारु रिकाम्या झालेल्या पिशव्या पडल्या आहेत. याचा त्रास कामानिमित्त बाजार समिती आलेले तालुक्यातील शेतकरी सर्वसामन्य नागरिक आणि महिला वर्गाला येथे होत आहे. हे मटक्याचे अड्डे धनदांडगे यांचे असल्याने कोणीही पोलिसांत तक्रार देत नाही. खुलेआम चालणारा मटका जुगार व्यवसाय व गावठी दारू विक्री बंद करावी, अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे शासन अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी कायदा करते, त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही याबाबत मात्र सखोल चौकशी होत नाही. त्यामुळे अशा धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.खेड तालुक्यातील माझ्या शेतकऱ्यांच्या संस्थेच्या ठिकाणी असे काही गैरप्रकार होत असेल, तर तत्काळ चौकशी करू. अवैधरीत्या मटका व गावठी दारूविक्री व्यवसायवर बाजार समितीकडून कारवाई करण्यात येईल.- नवनाथ होले, सभापती, कृषी उ. बाजार समिती, खेडराजगुरुनगर शहरात मटका व गावठी दारूविक्री सुरू असेल तर त्याची खात्री करून कारवाई करण्यात येईल. खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांना जाण्यास सांगितले आहे.- राम पठारे (उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड )अवैध धंद्यांसंदर्भात माहिती मिळाल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल. संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देण्यात येईल. काही दिवसांनंतर जिल्ह्यात गावागावांत दारुबंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करून ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून अवैध दारूविक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.- सुवेझ हक, अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस