शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावल्यास गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 03:40 IST

यापुढे शहरामध्ये अशा प्रकारे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावल्यास त्यावर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे लेखी पत्र महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, सर्व पक्षांचे शहराध्यक्ष यांना दिले आहे.

पुणे : शहराच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, चौकांमध्ये राजकीय व्यक्तींकडून वाढदिवसांच्या शुभेच्छा, विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावले जातात. याबाबत उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांवर याबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे शहरामध्ये अशा प्रकारे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावल्यास त्यावर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे लेखी पत्र महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, सर्व पक्षांचे शहराध्यक्ष यांना दिले आहे.महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने शहरात कोणत्याही स्वरूपाची जाहिरात करण्यासाठी स्वतंत्र जाहिरात व फलक नियंत्रण नियम २०१३ तयार केले आहेत. यानुसार सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, चौक आदी ठिकाणी फ्लेक्स, बॅनर, फलक लावण्यास प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी देण्यात येत नाही; परंतु त्यानंतरदेखील शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चौका-चौकांत, काही मोक्याच्या ठिकाणी विविध नेत्यांचे वाढदिवस, निवड-नियुक्तीनंतर अभिनंदनाचे, विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण शहरभर अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावून जाहिरातबाजी केली जाते. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत असून, संबंधित व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ अतंर्गत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.प्रशासनाने या कायद्याची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. या अंतर्गत महापालिका भवन समोर फुटपाथवर अनधिकृतपणे वाढदिवसांचे फ्लेक्स लावणाऱ्या दोन नगरसेविकांच्या विरोधात गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत; परंतु त्यानंतर प्रशासनावर कारवाई न करण्यासाठी दबाव आणला जातो. आता अशी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित अधिकाºयांवरच कारवाईचेआदेश न्यायालयाने दिले आहेत. यापुढे लोकप्रतिनिधींच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पत्र महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, सर्व पक्षांचे शहराध्यक्ष यांना दिले आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईशहरातील अनधिकृत फ्लेक्स, बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबत, लोकप्रतिनिधींना कळविण्यात आले आहे. त्यानंतरदेखील सध्या शहरामध्ये विविध नेत्यांचे वाढदिवस, निवड-नियुक्त्यानंतर अभिनंदन करणारे फ्लेक्स, बॅनर लावले जातात; परंतु आता यापुढे अशा प्रकारची जाहिरातबाजी करणाºयांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने महापालिकेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आमदार व सर्व पक्षांचे अध्यक्ष यांना लेखी पत्र देऊन याबाबत सांगण्यात आले आहे.- राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका