कर्वेनगर : वारजे माळवाडीमधील पीएमटी सोसायटीमध्ये महापालिकेने बुधवारी दुपारी २ वाजता अनधिकृत बांधकामे हटविली. यात ३ हजार स्केअर फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.बांधकाम निरीक्षक कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेने नोटीस बजावली होती. पण त्याकडे घरमालक दुर्लक्ष करत होता. त्यामुळे कारवाई करण्यात आली.कर्वेनगर गल्ली नबंर २मध्ये अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. नागरिकांच्या तक्रारीनुसार २ हजार स्केअर फुटावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. मनपा पोलिसांनी विरोध हाणून पाडला. मनपा बांधकाम विभाग आणि वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त गणेश सोनुले, बांधकाम निरीक्षक राजू खुडे, व्यंकटेश गाडे उपस्थित होते. (वार्ताहर)
अनधिकृत बांधकामे महापालिकेने पाडली
By admin | Updated: January 12, 2017 03:10 IST