शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांमुळे सर्वसामान्यच होताहेत उद्ध्वस्त

By admin | Updated: November 5, 2014 23:46 IST

कष्टाने पै-पै पुंजी जमवून घराचे स्वप्न साकारण्यासाठी सामान्य नागरिक आयुष्यभर धडपडत असतात. तोकड्या पगारातून शहरात घर घेणे परवडणारे नसल्याने हद्दीलगतच्या कमी किमतीच्या सदनिकेच्या आहारी तो पडतो

हणमंत पाटील, पुणेकष्टाने पै-पै पुंजी जमवून घराचे स्वप्न साकारण्यासाठी सामान्य नागरिक आयुष्यभर धडपडत असतात. तोकड्या पगारातून शहरात घर घेणे परवडणारे नसल्याने हद्दीलगतच्या कमी किमतीच्या सदनिकेच्या आहारी तो पडतो. मात्र, निकृष्ट दर्जामुळे एका क्षणात पत्त्याप्रमाणे कोसळणाऱ्या अनधिकृत इमारतीमुळे याच सामान्य नागरिकांचा संसार उद्ध्वस्त होतो. शासनाच्या कायद्यातून बिल्डर सहीसलामत सुटला तरी दोन्ही बाजूंनी सामान्य नागरिकच भरडला जातोय.नऱ्हे-आंबेगाव येथील सहा मजली इमारत कोसळण्याची घटना ताजी आहे. त्यामध्ये एका तरुणांचा नाहक बळी गेला, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. दोन वर्षांपूर्वी तळजाई येथील इमारतीतही अशाच १२ निष्पाप मजुरांचा बळी गेला होता. त्यानंतर महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर महिनाभर अनधिकृत इमारतींना नोटीस देणे आणि काही प्रातिनिधिक इमारतींवर कारवाई करण्यात आली. आताही प्रशासनाने आठवडाभरात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन, असे दिसते. या पार्श्वभूमीवर, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आलेले वास्तव असे : महापालिकेच्या हद्दीबाहेर जिल्हाधिकारी कार्यालय व नगरनियोजन विभाग बांधकामांना परवानगी देतात. त्यानंतर संबंधित बांधकामांची ग्रामपंचायतीकडे नोंदणी व करआकारणी अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायतींनी परस्पर परवानगी देण्याचा सपाटा लावला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी ग्रामपंचायतीला परवानगी देण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसण्याची शक्यता होती; परंतु महापालिकेच्या हद्दीत आणखी ३४ गावांचा समावेश करण्याची अधिसूचना तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ६ महिन्यांपूर्वी काढली. त्यानंतर पालिकेत समावेश होणार असल्याने नगररचना व ग्रामपंचायतीकडे कोणतीही नोंदणी न करता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचा जोर वाढला. एकट्या नऱ्हे गावात २,८३८ अनधिकृत बांधकामांच्या बोगस नोंदी आढळून आल्या आहेत. मात्र, महापालिकेत हे गाव जाणार असल्याने जिल्हा प्रशासनानेही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. याचे परिणाम मात्र सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत, असे जाणकारांचे मत आहे.