शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत जाहिरातबाजीच्या हेल्पलाइनचे वाजले बारा

By admin | Updated: November 9, 2014 01:06 IST

शहरातील चमकोगीरी करणा:या माननीयांच्या, तसेच त्यांच्या कार्यकत्र्याच्या अनधिकृत जाहिरातबाजीची माहिती नागरिकांनी महापालिकेस कळवावी,

पुणो : शहरातील चमकोगीरी करणा:या माननीयांच्या, तसेच त्यांच्या कार्यकत्र्याच्या अनधिकृत जाहिरातबाजीची माहिती नागरिकांनी महापालिकेस कळवावी, या उद्देशाने आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर अवघ्या 12 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे एरवी या जाहिरातीमुळे आकाशपातळ एक करणारे पुणोकर आता हेल्पलाइन बाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. 
शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात, तसेच प्रमुख चौकांमध्ये प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या जाहिरातबाजीला उधाण आलेले असते, या नेत्यांचे चाहते आणि कार्यकर्ते जागा मिळेल तिथे फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्स पोस्टर लावतात, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात शहराचे विद्रूपीकरण होते. 
या जाहिरातींचे प्रमाण एवढे मोठे आहे, की आकाशचिन्ह विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल दीड लाखाहून अधिक फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर काढलेले आहेत. मात्र, त्यानंतरही पुन्हा पुन्हा ही जाहिरातीची चमकोगीरी सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनाही याबाबत महापालिका प्रशासनास माहिती कळवावी, या उद्देशाने महापालिकेने तीन आठवडय़ांपूर्वी हेल्पलाइन सेवा सुरू केली होती.  या हेल्पलाइनवर नागरिकांनी फोन करून, एसएमएसद्वारे, तसेच ई-मेलद्वारे तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, संबंधित जाहिरातदारावर शहर विद्रूपीकरणांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार होते.  
(प्रतिनिधी)
 
हेल्पलाइनवर अवघ्या 12 तक्रारी 
या हेल्पलाइनवर पुणोकरांकडून मोठय़ा प्रमाणात तक्रारी येण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने त्यानुसार तक्रारींचे निराकारण करण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तयारीही करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात फोन क्रमांकावर चारच तक्रारी आल्या, तर एसएमएसद्वारे चार आणि ई-मेलद्वारेही चारच तक्रारी आल्याचे आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख उपायुक्त विजय दहिभाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
 
तक्रारीचा पुणोरी झटका 
हेल्पलाइनवर एका चोखंदळ पुणोकराने एसएमएसद्वारे केलेल्या तक्रारीतून आकाशचिन्ह विभागाचे चांगलेच कान टोचत पुणोरी झटका दिला आहे.  या तक्रारीत ‘उगाच आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडू नका, जरा डोळे उघडे ठेवून काम करा, सर्व काही दिसेल, त्यासाठी आम्हाला कशाला त्रस देता,’ अशा शब्दांत आकाशचिन्ह विभागाला आपल्या कामाची जाणीव करून दिली आहे.