शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उनाड स्टंटबाजांचा उपद्रव

By admin | Updated: May 8, 2017 02:43 IST

सध्या मावळात स्पोटर््स व मॉडिफाय दुचाकी वाहनांची क्रेज वाढली आहे. एकेकाळी एखाद दुसरी दिसणारी एक रुबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : सध्या मावळात स्पोटर््स व मॉडिफाय दुचाकी वाहनांची क्रेज वाढली आहे. एकेकाळी एखाद दुसरी दिसणारी एक रुबाबदार, वजनदार दुचाकी आत्ता दर पाच मिनिटांनी रस्त्यावरून जाताना दिसते. याचबरोबर इतर मॉडिफाय दुचाकीही दिसू लागल्या आहेत. काही खोडसाळ तरुण या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये ठरावीक बदल करून मिस फायरिंगच्या नावाखाली फटाक्यासारखे कानठळ्या बसविणारे आवाज काढत आहेत. त्यामुळे जवळून जाणारे इतर वाहनचालक दचकून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मावळासह कामशेतमध्ये दिवसभर फटाक्यांसारखे भयंकर आवाज होत असतात. अलीकडेच येथे नागरिकांबरोबर झालेल्या चर्चासत्रात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीही सांगितले की, मावळात वजनदार दुचाकींचे प्रमाण वाढले आहे. त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना मॉडिफाय वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. पण, पोलिसांकडून ठरावीक वाहनांवरच कारवाई होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. शहरात सध्या वजनदार दुचाकी व इतर स्पोर्टबाईकची क्रेझ वाढली असून सुसाट निघालेल्या तरुण पिढीतील काही उनाड व टवाळखोर मुलांकडून या वाहनांचा वेगळ्या कारणासाठी उपयोग होत आहे. सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून मिसफायरिंगच्या नावाखाली फटाक्यांच्या स्फोटासारखे आवाज काढले जातात. वाहतूक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. दुचाकींवर वेगवेगळे स्टंट करणे, दुचाकी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून भरधाव चालवणे, पादचाऱ्यांना कट मारणे या सारख्या प्रकारांमुळे नागरिक हैराण झाले असून रस्त्यावरून जाणारे इतर वाहनचालक दचकून बाजूला होत आहेत. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. शहरातील विद्यालय, शाळा, खासगी क्लासच्या भरण्या व सुटण्याच्या वेळेत या टवाळखोर मुलांना जास्तच चेव चढतो.शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर अनेक खासगी दवाखाने आहेत. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे तसेच वातावरणात बदल होऊन बहुतांश दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असते. काही उनाड मुलांच्या दुचाकीमधून निघणाऱ्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने रुग्ण त्रस्त होत असल्याची अनेक डॉक्टर तक्रार करीत आहेत. कामशेत हे मध्यवर्ती शहर असल्याने येथे नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यात दुचाकीच्या फायरिंगमधून मोठ्याने आवाज काढून वाहने वेगात चालवणाऱ्या या उनाड मुलांवर ठोस कारवाई कधी होणार अशी सर्व स्तरावरून विचारणा होत आहे. याशिवाय शहरात अनेक अल्पवयीन मुले विनापरवाना दुचाकी व चारचाकी वाहने बिनदिक्कतपणे चालवत असून या मुलांना पोलिसांची भीती राहिली नाही,असे बोलले जाते. अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने देऊन स्वत:च्या मुलांच्या व इतरांच्या जीवाशी खेळ करत आहेत.पोलिसांचे दुर्लक्ष : कारवाईची गरज वडगाव मावळ येथे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन वाहनचालकाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला असून, मावळातील ही पहिलीच कारवाई होत असल्याचे बोलले जात असतानाच कामशेत शहरात अनेक उनाड, अल्पवयीन, विनापरवाना वाहन चालवणाऱ्या मुलांवर कधी कारवाई होणार अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे. याशिवाय काही अपंग, एक हात नसलेले नागरिक आपल्या मुलाला दुचाकीचा ताबा देऊन दुसऱ्या हाताने वाहन हाकत असल्याचे गंभीर प्रकार घडत असतात. हे पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही असा आरोप अनेक जागरूक नागरिक व व्यापारी करत आहेत.