शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचा वाद न्यायालयात जाणार

By admin | Updated: June 18, 2014 00:33 IST

कायदेशीर मार्गाचा अवलंब करून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय उजनी बचाव समितीने रविवार (दि. १५) रोजी पळसदेव येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या बैठकीत घेतला

लोणी देवकर : उजनी धरणातील एकूण ६३.५० टक्के पाणीसाठा राखीव ठेवावा, धरणातील पाण्याची पातळी वजा पातळीच्या खाली जाऊ न देण्यासाठी शासनाने दर वर्षी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, धरणाच्या पाणी प्रदूषणात होणारी वाढ रोखावी, दर वर्षी उजनी धरणग्रस्तांना पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष थांबावा. यासाठी शांततेच्या मार्गाने लढा देण्याचा निर्णय उजनी बचाव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय उजनी बचाव समितीने रविवार (दि. १५) रोजी पळसदेव येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या बैठकीत घेतला. दर वर्षी उजनीच्या पाण्यावरून उद्भवणाऱ्या वादाला कंटाळून आता उजनी बचाव समितीच्या वतीने हा वाद न्यायालयात सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ११७ टीएमसी क्षमता असलेल्या उजनी धरणातील ६३.५० टक्के पाणीसाठा राखीव आहे. मात्र, दर वर्षी ही मर्यादा तोडून पाणी सोडले जाते.उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असल्याने ‘पिण्यासाठी पाणी सोडा’ या नावाखाली मोठ्याप्रमाणात धरणातून पाणी सोडण्यात येते. परिणामी, याचा फटका उजनी धरण परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो.भरलेले होते, मात्र तरीही आज स्थितीला उजनी धरण वजा पातळीवर गेले आहे. उजनी धरण व्यवस्थापकाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका उजनी धरण परिसरातील नागरिकांना मोठ्याप्रमाणात बसत आहे. उजनीतील पाण्याच्या सिंचनासाठी ९.६ टीएमसी ,कालवा सिंचन ३२.१५टीएमसी, कन्हेर सिंचन ३.१५ टीएमसी, सिना माडा उपसासिंचन ४.७५ टीएमसी, शिरपूर उपसा सिंचन योजना १.७३ टीएमसी, आष्टी उपसा सिंचन योजना १ टीएमसी, एकरूख उपसा सिंचन योजना ३.१८ टीएमसी, बार्शी उपसा सिंचन योजना २.५९ टीएमसी, सांगोला उपसासिंचन योजना २ टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजना १.८१ टीएमसी, अशा प्रकारे योजनांसाठी पाणी देण्याचे नियोजन कागदोपत्री करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पाणी राजकीय दबावापोटी सोडण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येत आहे. यासोबत उजनी धरणावर यापेक्षाही मोठ्या क्षमतेच्या पाणी योजना प्रस्तावित आहेत. या वेळी शिवसेनेचे विशाल बोंद्रे, काकासाहेब मांढरे, अ‍ॅड. महेश ढुके, मधुकर रंधवे, पळसदेवचे माजी सरपंच अनिल खोत, अरविंद जगताप, एकनाथ शेलार, संपत काळे, जगन्नाथ काटे, शिवाजी गलांडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी, पवार चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)