शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा घडला कार्यक्रम रद्द करण्याचा प्रकार; आता सर्वजण गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST

पुणे : टाटा लिट्रेचर लाईव्ह फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध लेखक नॉम चोम्स्की आणि पत्रकार विजय प्रसाद यांची होणारी ऑनलाईन चर्चा पर्यायाने ...

पुणे : टाटा लिट्रेचर लाईव्ह फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध लेखक नॉम चोम्स्की आणि पत्रकार विजय प्रसाद यांची होणारी ऑनलाईन चर्चा पर्यायाने त्यांचे निमंत्रणच रद्द करण्यात आले तरी सर्वजण गप्प का, असा संतप्त सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकाराची साधी चर्चा देखील झाली नाही. मात्र यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाच्या वेळेस निरुपद्रवी मंडळी साहित्य महामंडळावर तुटून पडली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये टाटा लिट. फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. चोम्स्की यांच्या ‘इंटरनॅशनलिझम और एक्सटिंगशन’ या नव्या पुस्तकावर चर्चा होणार होती. मात्र त्यांना व प्रसाद यांना दुपारी मेल करून ही चर्चा रद्द केल्याचे कळवण्यात आले. या पुस्तकात काही मुद्दे वादग्रस्त असल्याने दोघांचे निमंत्रण रद्द झाल्याचे समजते. असाच काहीसा प्रकार यवतमाळ साहित्य संमेलनामध्ये सुद्धा घडला होता. ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना देखील पत्र पाठवून संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका, असे आयोजकांनी सांगितले होते. मात्र आयोजकांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध करण्यात आला. संमेलन काळात सर्व वातावरण ढवळून निघाले होते. मात्र याची पुनरावृत्ती होऊनही माध्यमांनी साधी दखल पण घेतली नसल्याची खंत ठाले- पाटील यांनी व्यक्त केली.

------

कोट

टाटांच्या आजपर्यंतच्या भूमिकेशी पूर्णपणे विसंगत असा हा निर्णय आहे. टाटांची प्रतिमा अशी कचखाऊ कधीच नव्हती. टाटा लिट्रेचर फेस्टिव्हलचे डायरेक्टर अनिल धारकरच्या माध्यमातून कोणाला घाबरत आहेत? लोकांसमोर असलेला एक आदर्श या निर्णयामुळे ढासळत आहे. यापेक्षा संपूर्ण फेस्टिव्हलच रद्द केला असता तर ही नामुष्की तरी टळली असती.

- कौतिकराव ठाले पाटील

अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ