शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवेगाने दोन तरुणांचा केला घात

By admin | Updated: December 1, 2014 03:44 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू आहे. या तरुणांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते.

पिंपरी : ‘लखन’ या नावाच्या दोन मित्रांचा दुचाकी अपघातात रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगात असणाऱ्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, रक्तस्रावामुळे त्यांच्यावर मृत्यू ओढवला. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू आहे. या तरुणांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. हेल्मेट न वापरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी अडविल्यास शंभर रुपये दंड भरून स्वत:ची सुटका करून घेतली जाते. मात्र, हेल्मेट न वापरणे आपल्यासाठीच धोकादायक असल्याचे वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. रविवारी अशाच प्रकारे हेल्मेट न वापरणाऱ्या दोघांना जीव गमवावा लागला. मृतांमधील लखन कांबळे हा मित्रांसह भूमकरवस्ती येथे राहायला होता. सध्याची खोली बदलण्याचा त्याचा विचार होता. यासाठी बॅग आणण्यासाठी तो सकाळी नऊच्या सुमारास वाकडमधील विवेकानंदनगर येथे राहणाऱ्या नातेवाइकांकडे गेला होता. बॅग घेतल्यानंतर तेथून निघाला. दरम्यान, मित्र दंडगुलेला सोबत घेतले. लखन कांबळे दुचाकी चालवीत होता. वाकडगावाहून मानकर चौकाकडे येत असताना सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी भरधाव वेगातील दुचाकी मानकर चौकापासून जवळच अंतरावर दुभाजकाला घासली. त्यानंतर पंधरा ते वीस फुटांवर दुभाजकावरील आरएचएस/टी ३१ क्रमांकाच्या विजेचा खांबावर धडकली. भरधाव वेगात दुचाकीसह दोघेही खांबावर धडकल्याने ते रस्त्याच्या मधोमध उडून पडले, तर दुचाकी त्यांच्यापासून दहा ते बारा फूट दूर अंतरावर फेकली गेली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांनाही नागरिकांच्या मदतीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी घटनेची माहिती समजताच दोघांच्याही नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.हेल्मेटची डोकेदुखी नाहीरस्ते अपघातामध्ये हेल्मेट नसल्याने दगावलेल्या दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. हेल्मेटमुळे डोके बचावल्याने प्राणहानी होतनाही. हेल्मेट हाताळणे म्हणजे डोकेदुखी नसून स्वत:च्या सुरक्षा व बचावासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)