शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांनंतर पीडित महिलेला मिळाला १ लाखाचा धनादेश

By admin | Updated: January 10, 2016 03:53 IST

मुलगी हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून न घेतल्यामुळे, पोलीस अधीक्षकांना मानवी हक्क आयोगाने ठोठावलेल्या दंडाच्या रकमेचा धनादेश अखेर पीडित महिलेला मिळाला.

बारामती : मुलगी हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून न घेतल्यामुळे, पोलीस अधीक्षकांना मानवी हक्क आयोगाने ठोठावलेल्या दंडाच्या रकमेचा धनादेश अखेर पीडित महिलेला मिळाला. संबंधित महिलेला १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यामुळे ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव अ‍ॅड. तुषार झेंडे यांच्या तक्रारकर्त्या महिलेच्या वतीने सुरू असलेल्या लढ्याला चार वर्षांच्या कालावधीनंतर यश मिळाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. चार आठवड्यांत नुकसान भरपाईची एक लाखाची रक्कम देण्याचे आदेश दिले होते; मात्र त्याला जवळपास दोन वर्षं लागली. दि. ३ आणि ४ नोव्हेंबर २०११ मध्ये ही घटना घडली होती. उंडवडी सुपे येथे संबंधित महिला तिच्या कुटुंबासह वास्तव्यास होती. तिचे चौघा आरोपींनी तिची आई आजारी असल्याचे कारण सांगून अपहरण केले. दरम्यान, तिच्या पतीने विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या दिवशी मुलीच्या आईला बीड जिल्ह्यातून फोन आला. मुलगी आमच्याकडे आहे, तिला घेऊन जा, असे सांगितले. हा प्रकार मुलीच्या आईने नातेवाइकांना सांगितला. या वेळी मुलीचे अपहरण झाल्याचा धक्का त्यांना बसला. वडगाव निंबाळकर पोलिसांना याबाबत माहितीदेखील देण्यात आली. मात्र, तुम्हीच गोडीत मुलीला घेऊन या, असे सांगितले. सलग ५ दिवस मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी त्या विवाहित महिलेला इंदापूर बसस्थानकावर आणून सोडले. या वेळी तिघा आरोपींना तिच्या नातेवाइकांनी पकडले होते. त्यांची गाडीदेखील पोलिसांच्या ताब्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई न करता आरोपींना सोडून दिले. याची विचारणा केली; मात्र वडगाव निंबाळकर पोालसांनी दाद दिली नाही. तत्कालीन पोलीस हवालदार हसन पानसरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सुरू होता. या गंभीर प्रकरणात टाळाटाळ झाल्याने अखेर अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीसाठी तिच्या आईने मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली. त्यासाठी अ‍ॅड. झेंडे यांच्यामार्फत त्यांनी तक्रार दाखल केली. सुनावणी दरम्यान नोटिसा बजावूनही तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहिया हजर राहिले नाहीत.मानवी हक्क आयोगाचे मुख्य न्यायमूर्ती समिंदर रुद्रय्या बन्नुरमठ यांनी ५ मे २०१४ रोजी त्यांना १ लाख रुपये दंड ठोठावला. ‘दंड भरण्यास तरतूद नाही ’ असे कारण सांगून दंड भरण्यास टाळाटाळ करण्यात आली. या नंतर या संदर्भात गृह खात्याचे अवर सचिव आणि मानवी हक्क आयोगाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने लक्ष घातले. दि. १४ सप्टेंबर २०१५ ला शासन निर्णय जाहीर करण्यात आला. विवाहित महिला हरविल्याची तक्रार ठाण्यात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. तिच्यावर अत्याचार झाले, तरी आरोपींवर कारवाई वेळीच केली नाही, याची गंभीर दखल आयोगाने घेतली होती. राज्य मानवी हक्क आयोगाच्या शिफारशीवरून आर्थिक साह्य देण्याचा आदेश आयोगाने दिला होता. शनिवारी नुकसानभरपाईचा धनादेश दिल्याची माहिती अ‍ॅड. झेंडे यांनी दिली .