शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीतील स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू

By admin | Updated: June 15, 2017 14:23 IST

खडकीतील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत सकाळी सव्वानऊच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेवेळी स्फोट झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 15- खडकीतील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत सकाळी सव्वानऊच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेवेळी स्फोट झाला आहे. या स्फोटात फॅक्टरीत काम करणारे दोन कामगार जागीच ठार झाले आहेत. अशोक डुबल  आणि मारिया रॉक अशी स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. स्फोटाच्या आवाजाने खडकी परिसर सकाळी हादरून गेला होता. 
 
भारतीय संरक्षण विभागाअंतर्गतच्या खडकी आयुध निर्माण फॅक्टरी ( दारूगोळा कारखाना ) मध्ये सकाळच्या वेळी काम सुरू असताना, दारूगोळा उत्पादन विभाग दोनमध्ये ९.२० च्या सुमारास अचानक स्फोट झाला. दोन स्फोटक वस्तू हाताळताना ही घटना घडली. ही वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात असताना हा स्फोट झाला. उत्पादन प्रकियेवेळी झालेल्या या अपघाताच्या दुर्घटनेत डुबल आणि रॉक हे दोन कामगार जागीच ठार झाले.  या घटनेची माहिती मिळताच संरक्षण खात्याच्या अग्निशामक विभागाची वाहनं तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं. 
 
मृत झालेले कामगार डुबल मूळचे कर्नाटकचे तर मरिया कोईमतूरच्या आहेत. डुबल यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मारिया यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. मारिया यांच्या पत्नीला हदयविकाराचा त्रास आहे, या दुर्घटनेची माहिती मिळताच, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यांना लगेच खडकीतील फॅक्टरी रूग्णालयात दाखल करण्यात आले. चार वर्षापुर्वी अशीच दुर्घटना फॅक्टरीत घडली होती. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर दोन वर्षापुर्वी घडलेल्या अशाच दुर्घटनेत दापोडीत राहणाऱ्या एका कामगाराला कायमचे जायबंदी होण्याची वेळ आली होती.