दौंड : गिरीम (ता. दौंड) येथील वायरलेस फाटा परिसरात दुचाकी गाड्यांच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील दुचाकी वाहनधारक त्रस्त झाले आहेत.संजय शिवाजी जाधव (रा. गिरीम, ता. दौंड) यांची बेटवाडी-गार परिसरात शेती आहे. ते शेतात ऊस पिकाला पाणी देण्यासाठी दुचाकी (क्र. एमएच ४२ डब्ल्यू ५२३७) या दुचाकीवरून गेले असता गाडी शेतात लावली. शेतातील काम झाल्यानंतर जाधव हे गाडीकडे आले असता ही गाडी कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेली. यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध केली; परंतु त्यांना दुचाकी गाडी सापडली नाही. याबाबत जाधव यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गाडी चोरीची तक्रार दिली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात सुमारे सहा ते सात गाड्या चोरीला गेल्या आहेत. या गाड्या चोरी होण्यामागे परिसरातील माहितीचाच चोर असू शकतो, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. (वार्ताहर)