देहूरोड : मुंबई-पुणे महामार्गावर दुचाकी व मोटारीच्या झालेल्या अपघातात जंगी सॅमस दुरानी (वय २९, रा. सुविधा टावर्स, मीरारोड, मुंबई ) या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या निगडी जकातनाक्याजवळ रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडला.महामार्गावरील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या जकात नाक्याजवळ सकाळी आठच्या सुमारास पुण्याकडे भरधाव जाणारी दुचाकी (एमएच ०४ जीडब्ल्यू ६१८६) समोरून मोटारीस (एमएच १४ ईयू २९०१) धडकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील तरुण मुंबई येथील असून, मर्सिडीज बेंझ कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून शनिवारीच नियुक्त झाला होता. तपास निरीक्षक अरुण मोरे यांच्या मार्गदर्शनात फौजदार श्यामसिंह परदेशी करीत आहेत. (वार्ताहर)
दुचाकीस्वार जागीच ठार
By admin | Updated: January 23, 2017 02:51 IST