पुणे : ३१ आॅक्टोबरपर्यंत या चारही धरणांमधील पाण्याची स्थिती पाहून पुन्हा दोन वेळ पाण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभागृह नेते सुभाष जगताप यांनी सांगितले. आॅक्टोबर महिन्यात कालवा समितीची बैठक होते. या वेळी या चारही धरणांत १०० टक्के पाणी असेल व दोन वेळ पाणी देऊनही धरणांत ३१ आॅगस्टपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवणे शक्य असल्यास पुन्हा दोन वेळ पाणी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तर, एक वेळ पाणीपुरवठा मागील वेळापत्रकाप्रमाणेच करण्यात येणार आहे. दरम्यान, जून महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे २ टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे २८ जूनपासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात १२ टक्के कपात केली होती. जुलै महिन्याचा दुसरा आठवडाही उलटूनही पाऊस न झाल्याने धरणांत १.१० टीएमसीच पाणी शिल्लक होते. त्यामुळे पाणीकपात ३५ टक्क्यांवर नेत ११ जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. आता धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने, तसेच पाणीसाठ्यातील वाढही थांबल्याने पुन्हा एक वेळ पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याबाबत आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले. सभागृहनेते सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे , स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी, तसेच पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दोन वेळ पाण्याचा निर्णय आॅक्टोबरनंतर
By admin | Updated: August 15, 2014 00:36 IST