शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

दोन हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी अद्याप दिवास्वप्नच

By admin | Updated: May 13, 2015 02:41 IST

राज्यातील साखर हंगाम संपला तरीही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची किंमत मिळाली नाही. केंद्र आणि राज्य सरकार गेल्या ६ महिन्यांपासून

सोमेश्वरनगर : राज्यातील साखर हंगाम संपला तरीही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची किंमत मिळाली नाही. केंद्र आणि राज्य सरकार गेल्या ६ महिन्यांपासून एफआरपीबाबत फक्त चर्चाच करत असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर अजून ठोस उपाययोजना होत नाहीत. गेल्या आठवड्यात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले असल्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा ऊस उत्पादकांसाठी दिवास्वप्न ठरल्याची चर्चा ऊस उत्पादकांमध्ये आहे. शासनाने २ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली़ पण, त्याबाबतची कोणतीही सूचना अथवा कोणतीही माहिती जिल्हा बँका अथवा साखर कारखान्यांपर्यंत अद्याप पोहचलेली नाही़ या वर्षभरात तब्बल ९०० रुपयांनी साखरेचे दर उतरले. त्यामुळे कारखान्यांची एफआरपी व राज्य बँक देत असलेली पोत्यावरील उचलीत तब्बल एक हजार रुपयांचा फरक भरून काढणे, साखर कारखान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी केंद्र सरकारने साखर उद्योगाला मदत करावी, अशी साखर कारखानदारांचीअपेक्षा होती. मात्र, ही मदत कर्ज स्वरूपात नसावी. तर ती अनुदान स्वरूपात असावी, अशी अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली होती. मात्र, कारखाने सुरू झाल्यापासून साखरेच्या वारंवार पडणाऱ्या दरामुळे राज्य बँकेने ४ वेळा साखरेच्या मुल्यांकनात घट केली. त्यामुळे एफआरपी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा धुसर झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जानेवारीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. या वेळी साखर निर्यातीसाठी टनाला ५ हजार रुपये अनुदान, २० लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी आणि ऊस उत्पादाकांना उचित भाव देण्यासाठी दि.२१ जानेवारी रोजी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. माजी कृषिमंत्री शरद पवार, राज्य संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावर ऊस प्रश्नांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन मोदींनी दिले. आता, या आश्वासनांची पूर्तता होणार कधी, याकडे साखर कारखान्यांसह ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)