शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दोन जागा बिनविरोध

By admin | Updated: May 3, 2017 01:46 IST

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९ जागांपैकी दोन जागा बिनविरोध निवडून

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९ जागांपैकी दोन जागा बिनविरोध निवडून झाल्याने १७ जागांसाठी सुमारे ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज (दि.२) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपा व राष्ट्रवादीच्या दोनही पक्षांच्या नेत्यांना उमेदवारांच्या माघारी घेण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. माघार घेण्याच्या अंतिम टप्प्यात अनेक दिग्गजांनी माघार घेतली. या वेळी कृषी व पणन मतदार संघातून राष्ट्रवादीचे हनुमंत सासवडे, तर ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून भाजपाच्या तृप्ती संतोष भरणे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व भाजपा अशा दोन्ही पक्षांनी दमदार पॅनेल उभे करत एकमेकांसमोर खडे आव्हान निर्माण केले आहे. राष्ट्रवादी व भाजपाने प्रत्येकी एक जागा जिंकून खाते खोलले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार दोन्ही पक्षांकडून करण्यात आला. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी जाहीर केली, तर भाजपाच्या उमेदवारांची अंतिम यादी भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके यांनी जाहीर केली. या वेळी अशोक पवार यांनी भूमिका स्पष्ट करताना विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढविली जाणार असून शेतकरी विकास हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तर दादा पाटील फराटे व भगवान शेळके यांनी सक्षम पॅनेल उभा केला असल्याचे सांगत विरोधकांना चांगले आव्हान निर्माण केले असल्याचे सांगितले.(वार्ताहर)भाजपा उमेदवारकृषी पतसंस्था मतदार संघ (सर्वसाधारण)अ‍ॅड. देवराम धुमाळ, राहुल गवारे, आनंदराव हरगुडे, अशोक माशेरे, तात्यासाहेब सोनवणे, गणेश मचाले, संतोष मोरे कृषी पतसंस्था मतदार संघ (महिला)-छाया अप्पासाहेब बेनके, सुजाता गाजरेकृषी पतसंस्था मतदार संघ (इतर मागास)-विकास शिवलेकृषी पतसंस्था मतदार संघ (भटक्या विमुक्त जाती/जमाती)- डॉ. हेमंत पवारग्रामपंचात मतदार संघ (सर्वसाधारण)-अनिल नवले, संभाजी कर्डिलेग्रामपंचात मतदार संघ (अनुसूचित जाती/जमाती)- तुकाराम थोरात ग्रामपंचात मतदार संघ (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)-तृप्ती संतोष भरणे(बिनविरोध)हमाल व तोलार मतदार संघ-कुंडलिक दसगुडेराष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादीकृषी पतसंस्था मतदार संघ (सर्वसाधारण)-शशिकांत दसगुडे, विश्वास ढमढेरे, अ‍ॅड. वसंतराव कोरेकर, शिवाजी वडघुले, बाबाजी निचित, शंकर जांभळकर, प्रकाश पवार, ग्रामपंचात मतदार संघ (सर्वसाधारण)-मानसिंग पाचुंदकर, धैर्यशिल मांढरे,ग्रामपंचात मतदार संघ (अनुसूचित जाती/जमाती)- विजेंद्र गद्रेकृषी पतसंस्था मतदार संघ (महिला)-मंदाकिनी पवार,कौशल्या भोरकृषी पतसंस्था मतदार संघ (इतर मागास)-अनिल भुजबळकृषी पतसंस्था मतदार संघ (भटक्या विमुक्त जाती/जमाती)-सतीश कोळपेकृषी व पणन प्रक्रिया मतदार संघ-हनुमंत सासवडे (बिनविरोध)