शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

By admin | Updated: April 18, 2016 03:03 IST

येथील जुना मुळा-मुठा कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. १७) दुपारी दोनच्या सुमारास मांजरी बुद्रुक

हडपसर : येथील जुना मुळा-मुठा कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. १७) दुपारी दोनच्या सुमारास मांजरी बुद्रुक घुले वस्ती येथे घडली. घडलेल्या हे घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली होती. प्रेम प्रवीण कुंवर (वय १३) व गणेश विजय राखपसरे (वय ११, दोघेही रा. घुले वस्ती, मांजरी बुद्रुक) असे मृत्यू पावलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. प्रेम व गणेश दोघे महादेवनगर येथील सानेगुरुजी विद्यालयात शिकत होते. प्रेम कुंवर व गणेश राखपसरे हे दोघे अन्य एका मुलासह घरापासून काही अंतरावर असलेल्या जुना कालव्यात पाण्यात उतरून कडेला खेळत होते. दोघांनाही या घाण पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. हे पाहून शेजारीच शेळ्या-मेंढ्या चारत असलेल्या एका महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा या महिलेच्या पतीने दूरवरून पळत येऊन कालव्यात उडी घेऊन काही वेळ या दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिसऱ्या मुलाने घराकडे धाव घेऊन लोकांना ही माहिती कळविली. तेव्हा स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. साडेचारच्या सुमारास बुडालेल्या ठिकाणापासून काही फूट अंतरावर या दोघा मुलांंना पाण्याबाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांचा हलगर्जीपणामुलांना बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी या मुलांना रुग्णालयात हलविण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली नाही. नातेवाइकांशी संवाद साधला नाही. त्यामुळे एका मुलाला स्थानिक कार्यकर्त्याने ससून रुग्णालयात आपल्याच वाहनातून नेले, तर दुसऱ्या मुलाला दुचाकीवर खासगी रुग्णालयातून नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित करताच या मुलाला थेट पुन्हा घरी आणण्यात आले. काही वेळ गेल्यानंतर पुन्हा या मुलाला पोस्टमॉर्टमसाठी हलविण्यात आले. पोलिसांनी नातेवाइकांना योग्य मार्गदर्शन न केल्याने घटनेनंतर त्यांची धावपळ झाली.