शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन पोलिसांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:28 IST

येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे : येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस हवालदार नामदेव बाबूराव ढाकणे (वय ३७, रा. आयआरबी औरंगाबाद, हरसुल जेल परिसर, मूळ रा. जालना) आणि पोलीस शिपाई शुक्राचार्य बबन टेकाळे (२७, रा. जालना, मूळ रा. बुलडाणा) अशी त्यांची नावे आहेत.या प्रकरणात यापूर्वी गिरीश बापूसाहेब अवधूत (३२, रा. पिंपळेनिलख, पुणे) आणि स्वप्निल दिलीप साळुंखे (३२, रा. विश्रामबाग सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय प्रवीण दत्तात्रय भटकर (रा. बावधन), भूषण निरंजनराव देऊलकर आणि तेजस राजेंद्र नेमाडे या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.>उत्तरपत्रिकेत केले फेरबदलपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ मध्ये एकूण ८३ सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी १२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या ओएमआर (आॅप्टिकल मार्क रिकॉग्नेशन) शीट पुरवणे; तसेच तपासणी करण्याचे काम बावधन येथील प्रवीण भटकर याच्या मे. इटीएच लिमिटेड कंपनीकडे देण्यात आले होते.भरती प्रक्रिया कालावधीत शारीरिक चाचणी तसेच इतर परीक्षांमध्ये पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २१ एप्रिल रोजी कवायत मैदानावर घेण्यात आली. त्यात ३ हजार ७३० उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रवीण भटकर आणि इतर चार आरोपींकडे देण्यात आले. आरोपींनी ३२ उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेत फेरबदल केल्याचे समोर आले.