कल्याण- अहमदनगर महामार्गावर गुंजाळवाडी या ठिकाणी मोटारसायकल व ट्रकच्या अपघातात मोटार सायकलवरील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार: कल्याण- अहमदनगर महामार्गावरील गुंजाळवाडी (ता. जुन्नर) याठिकाणी अहमदनगरकडून येत असलेला ट्रक (एम.एच.१२एफ.झेड ४०९७) ने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील रघुनाथ मच्छिंद्र झांबाडे (वय३०) व मिथुन बांदलदास (वय६०) हे दोघेही शिरूरचे असून ते जागीच ठार झाले. तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार करत आहे.