शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीप्रकरणी दोन जणांना अटक

By admin | Updated: January 11, 2017 01:53 IST

काळखैरेवाडी (ता. बारामती) येथील घरफोडीप्रकरणी दोन जणांना बारामती गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

बारामती : काळखैरेवाडी (ता. बारामती) येथील घरफोडीप्रकरणी दोन जणांना बारामती गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे.१५ डिसेंबर २०१६ रोजी मध्यरात्री काळखैरेवाडी गावच्या हद्दीत मोरगाव-सुपे रस्त्यावर बांदलवस्ती येथे चोरीचा प्रकार घडला होता. येथील राजाराम शंकर भोंडवे यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोने, चांदीसह रोख रक्कम असा एकूण १ लाख २७ हजारांचा ऐवज घरफोडी करुन लंपास केला. या संदर्भात वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. घरफोडीचा तपास बारामतीच्या गुन्हे शोध पथकाच्या वतीने सुरु होता. तपासादरम्यान , गुप्त बातमीदारामार्फत गुन्हे शोध पथकाला या घरफोडीबाबत माहिती मिळाली. हा गुन्हा बावकर ऊर्फ मयूर गोरख पवार (वय २२, धंदा मजुरी, रा. काळखैरेवाडी,ता. बारामती) याने त्याच्या इतर दोन साथीदारांसमवेत केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बावकर याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दोन साथीदारांमार्फत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या मालापैकी तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नागनाथ अरुण कांबळे (रा. गोतंडी, वय ३६, ता. इंदापूर) याला विकले होते. ते दागिने जप्त करण्यात आले. ८४ हजार ३५० रुपये या दागिन्याची किंमत आहे. बावकरचे दोन साथीदार फरार आहेत.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, संदीप मोकाशी, रविराज कोकरे, सुभाष डोईफोडे, संदीप कारंडे, तुषार सानप, सदाशिव बंडगर यांनी सापळा रचून आरोपींना पकडले. (प्रतिनिधी)