शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमध्ये दोन महिन्यांचे नियोजन

By admin | Updated: May 5, 2016 04:31 IST

खडकवासला कालव्याचे पाणी येत्या सहा दिवसांत इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात पोहोचेल. दोन महिने पुरेल एवढे पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीचोरीला आळा

इंदापूर : खडकवासला कालव्याचे पाणी येत्या सहा दिवसांत इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात पोहोचेल. दोन महिने पुरेल एवढे पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीचोरीला आळा घालण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभाग इंदापूरचे उपविभागीय अभियंता के. के. देवकाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. देवकाते म्हणाले, ‘‘मागील उन्हाळी पाणी आवर्तनात इंदापूरला १.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. या वेळी इंदापूर, दौंड व हवेली या तालुक्यांसाठी एकूण १ टीएमसी पाणी दिले जाणार आहे. नवीन मुठा कालव्यातून शेटफळ गढे, निरगुडे मार्गे तरंगवाडी तलावात पाणी येईल. तलावातील पाणी लगतच्या इंदापूर नगर परिषद, तरंगवाडी, गोखळी, विठ्ठलवाडी, झगडेवाडी या गावांना व विद्या प्रतिष्ठान, कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांना देण्यास प्राधान्य दिले जाईल. यातून शक्य झाल्यास ते पाणी खडकवासला कालव्याच्या परिसरातील कवठळी, बळपुडी, न्हावी, रुई, कळस, गोसावीवाडी, अकोले, निरगुडे, शेटफळगढे, पिंपळे या भागाला दिले जाईल. पाणी आल्यानंतर त्याची चोरी होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाचे पुण्याचे उपकार्यकारी अभियंता धोडपकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात ३ पोलीस अधिकारी, १५ पोलीस कर्मचारी, महावितरण कंपनीचे ३ अधिकारी, पाटबंधारे विभागाचा १ कार्यकारी अभियंता, २ उपविभागीय अधिकारी, ८ शाखा अभियंते आदींचा समावेश करण्यात आला आहे. पाणीचोरी करताना आढळणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. सायफन, विद्युत पंपदेखील कारवाईतून सुटणार नाहीत.’’‘पंपांचा वीजपुरवठा खंडित करा’तालुक्यात पाणी आल्यानंतर खडकवासला कालव्यालगतच्या भागातील विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कालव्यांच्या दारांची दुरुस्ती करून घेण्यात आली आहे, असे देवकाते यांनी स्पष्ट केले.