शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा प्रयत्न करणारे दोन सख्खे अल्पवयीन भाऊ ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:12 IST

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करून जिवे ठार मारणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा सख्ख्या अल्पवयीन भावांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ...

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करून जिवे ठार मारणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा सख्ख्या अल्पवयीन भावांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी मनीषा दिसले (रा़ श्रीपाद हाईटस, जांभुळवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ दिसले यांचा मुलगा रवींद्र राजेंद्र दिसले (वय १८) हा २४ मे रोजी रात्री साडेआठ वाजता आंबेगाव खुर्द येथील ओढ्यात मित्रांबरोबर गेला होता़ जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघा अल्पवयीन भावांनी राजेंद्र याच्या डोक्यावर, हाताचे मनगटावर, पाठीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ गंभीर जखमी झालेल्या रवींद्र याच्यावर उपचार करण्यात येत आहे़

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अंमलदार गणेश सुतार व शिवदत्त गायकवाड यांना ही अल्पवयीन मुले धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या सूचनेनुसार मंदिराजवळ सापळा रचून दोघांना पकडण्यात आले़ रवींद्र याने काही दिवसांपूर्वी त्यांना मारहाण केली होती़ त्या कारणावरून हल्ला केल्याचे या दोघांनी सांगितले़ पोलीस निरीक्षक संगीता यादव अधिक तपास करीत आहेत.