भोर : ‘कारखान्यातील सर्व मशिनरींची दुरुस्ती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, कार्यक्षेत्रत उपलब्ध ऊस व ऊसतोडणी टोळय़ांचे योग्य नियोजन यांमुळे क्रेश्ंिागमध्ये वाढ होऊन राजगड सहकारी साखर कारखाना या वर्षी सुमारे अडीच लाख टन उसाचे गाळप पूर्ण करेल,’ असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या 25 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प.पू. नारायणमहाराज यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, स्वरूपा थोपटे, बाळासाहेब थोपटे, कार्यकारी संचालक विश्वनाथ हिरेमठ, दिलीप बाठे, दिनकर धरपाळे, दीपक कापडणीस, नितीन भरगुडे, शिवाजी कोंडे, के. डी. सोनवणो, सुनील पाचकाळे, चंद्रकांत थोपटे, चंद्रकांत तळेकर, शोभा जाधव, सीमा सोनवणो, रवी सोनवणो, शंकर मालुसरे, दिनकर धरपाळे, पंढरीनाथ शिंदे, विठ्ठल आवाळे, अण्णासाहेब भिकुले, गीतांजली शेटे, गजानन शेटे, मदन खुटवड, अशोक शिवतरे, सुभाष कोंढाळकर, डॉ. विजयालक्ष्मी पाठक, वसंत किंद्रे, राजेशिर्के व कामगार, सभासद उपस्थित होते.
थोपटे म्हणाले, ‘गळीत हंगामाला उशीर झाला असला तरी कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती व नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे 1,8क्क् ते 2,क्क्क् हजारांर्पयत क्रेशिंग होईल. गतवेळीपेक्षा अधिक अडीच लाखांपेक्षा जास्त उसाचे गाळप होईल. राज्य शासन ठरवून देईल, त्या प्रमाणात इतर कारखान्यांप्रमाणो ‘राजगड’कडून दर दिला जाईल. कारखान्याची परिस्थिती चांगली नसली, तरी कामगारांच्या योगदानाने कारखाना सुरू आहे, त्यामुळे या वर्षी 12 कामगारांना 12 टक्के बोनस देण्यात येणार आहे,’ असे त्यांनी या वेळी जाहीर केले. या वेळी नारायणमहाराज व अनंतराव थोपटे यांची भाषणो झाली. राजेंद्र शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिनकर धरपाळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
4राजगड साखर कारखाना अडचणीत असून निवडणुकीमुळे कारखान्याच्या खर्चात अजून 5क् लाखांची वाढ होणार आहे, यामुळे अधिक तोटा वाढणार असल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यास कारखान्याचे 5क् लाख वाचणार आहेत. कारखान्याला त्यामुळे चांगले दिवस येणार आहेत, यामुळे राजगड कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन संग्राम थोपटे यांनी केले.
4राजगड कारखान्याला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर वीजनिर्मिती (को- जनरेशन) प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो येत्या 3 महिन्यांत सुरू करणार आहे, असे संग्राम थोपटे यांनी सांगितले.