शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक ट्रेलरच्या अपघातात दोन ठार

By admin | Updated: November 24, 2014 23:41 IST

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेत ट्रेलरचालकासह दोनजणांचा मृत्यू झाला.

पुणो : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेत ट्रेलरचालकासह दोनजणांचा मृत्यू झाला. हा अपघात थेऊर फाट्याच्या पुढे असलेल्या कुंजीरवाडी येथे रात्री एकच्या सुमारास झाला. धडक झाल्याबरोबर ट्रेलरच्या केबीनने आणि इंजिनने पेट घेतला. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.
अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफीसर प्रकाश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथे ट्रेलरने ट्रकला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वाहनांनी पेट घेतल्याची माहिती पुणो अग्निशामक दलाला रात्री एकच्या सुमारास कळवण्यात आली होती. त्यानुसार मुख्य केंद्रातील एक  बंब घेऊन गोरे व त्यांचे सहकारी विलास दुगाने, चालक कचरे, गणपत पडे, राहुल बांदल, संजय जाधव, योगेश माने, तेजस खरीवले, सचिन आवाळे, कैलास टकले, प्रदीप पवार, सुनिल कराळे हे घटनास्थळी तातडीने पोचले. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना रस्ता मोकळा मिळाला होता. 
अपघाताचे स्वरुप गंभीर होते. ट्रेलर क्र. एमएच. क्6, एक्यू. 4559 या वाहनाने ट्रक क्रमांक एमएच. 12, एचडी. 7334 ला पाठीमागून धडक दिली होती. ट्रेलरचे केबीन पुर्णपणो आत चेपले गेले होते. या केबीनला आणि इंजिनाला आग लागलेली होती. अपघात होऊनही अध्र्या तासाच्यावर कालावधी झालेला होता. पाण्याचा मारा करुन ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आणखी एक बंब आणि पाण्याचा टॅंकर मागवण्यात आला. त्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. दरम्यान अपघात झालेल्या रस्त्यावरील वाहतूक बंद करुन ती दुस-या लेन मधून वळवण्यात आली होती. (प्रतिनिधी)