शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दोनशे मतदानकेंद्रे संवेदनशील

By admin | Updated: October 9, 2014 05:21 IST

पोलीस, प्रशासन व उमेदवारांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०० मतदानकेंदे्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत

पुणे : पोलीस, प्रशासन व उमेदवारांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०० मतदानकेंदे्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील उमेदवारांनी सुचविलेल्या ९६ मतदानकेंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. सूक्ष्म निरीक्षक व व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून या मतदान केंद्रावर नजर ठेवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांनी सुचविलेल्या मतदानकेंद्राचाही संवेदनशील मतदानकेंद्र निश्चित करताना विचार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत १०८ संवेदनशील मतदानकेंदे्र होती. नवीन निकषामुळे त्यात दोनशेपर्यंत वाढ झाली आहे. एखाद्या मतदानकेंद्रात सर्वांत कमी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असेल व त्या केंद्रावर सिंगल व्होटरची संख्या अधिक असणारे केंद्र संवेदनशील ठरविण्यात येते. तसेच ज्या मतदानकेंद्रात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असेल व झालेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान एकाच उमेदवाराला झालेले असेल तर त्याचा समावेश संवेदनशील केंद्राच्या यादीत होतो. आयोगाच्या या निकषानुसार मतदान केंद्रांचे सर्वेक्षण करून संवेदनशील मतदानकेंद्रे घोषित करण्यात आली आहेत.या शिवाय पोलिसांनी अथवा उमेदवारांनी काही मतदारकेंद्रांत गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशा मतदानकेंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित केल्याने, संवेदनशील मतदारसंघात वाढ झाली आहे. उमेदवार व पोलिसांनी सूचविलेल्या ९६ संवेदनशील मतदारकेंद्रांसाठी १५० सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदानकेंद्रात पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यावर सूक्ष्म निरीक्षक मतदान केंद्राच्या परिस्थितीचा अहवाल निवडणूक निरीक्षकांना त्याच दिवशी पाठविणार आहेत. तसेच या केंद्राचे छायाचित्रणही केले जाणार आहे तर १०४ मतदानकेंद्रांचे चित्रीकरण केले जाईल. या विषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘जिल्ह्यातील संवेदनशील मतदार केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी या मतदार केंद्रावर अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे.’ (प्रतिनिधी)