शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

टोळक्याकडून दोघांवर हल्ला

By admin | Updated: December 26, 2016 04:05 IST

किरकोळ कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने दोघांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या

पिंपरी : किरकोळ कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने दोघांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निगडी येथील ओटास्कीम झोपडपट्टीतील आझाद चौकाजवळील संग्रामनगर येथे घडली. रजनीकांत उत्तम क्षीरसागर (वय ४८) आणि अमित अप्पासाहेब गोरे (वय २२, दोघे रा. ओटा स्कीम, निगडी) अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हौसराव शिंदे, बाळा बरगले, सागर शिंदे, राजू शिंदे, उमेश आव्हाड, विशाल झेंडे (सर्व रा. ओटास्कीम झोपडपट्टी, निगडी) यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रतीलाल उत्तम क्षीरसागर (वय ४६) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.निगडी, ओटास्कीम येथील रहिवाशांच्या मुलाखती रविवारी एक वृत्तवाहिनी घेत होती. त्या वेळी आरोपी आणि रजनीकांत क्षीरसागर हे दोघेही तिथे होते. दरम्यान, आरोपी हौसराव याने आणि त्याच्या साथीदाराने रजनीकांत यांना शिवीगाळ केली. रजनीकांत हे दुसऱ्या इमारतीकडे जात होते. त्या वेळी आरोपी मोटारीतून तिथे आले. या घटनेनंतर परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. निगडी पोलीस तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)