शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

परदेशात घेतले दोन डोस; भारतात कोणता घ्यायचा?; ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 07:32 IST

प्रिकॉशन डोससाठी पात्र असूनही डोस घेता येईना

- नम्रता फडणीस पुणे : गतवर्षी लॉकडाऊन काळात परदेशात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी तिथेच दोन डोस घेतले. आता भारतात आल्यानंतर खबरदारी म्हणून नक्की कोणत्या कंपनीचा डोस घ्यायचा, याबाबत ज्येष्ठांमध्ये संभ्रम आहे. यातच शासनाच्या कोविन ॲपवर त्यांची नोंदणी झालेली नसल्याने दोन डोस घेऊनही डोस न घेतलेल्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या डोससाठी कशाप्रकारे नोंदणी करायची, असा प्रश्न ज्येष्ठांना पडला आहे. शासनाने अशा नागरिकांसह इतरांसाठी सुस्पष्ट नियमावली जाहीर करावी, अशी सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.  

राज्यातील सर्व शासकीय, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ६० वर्षांवरील वयाच्या सहव्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीचा प्रिकॉशन (प्रतिबंधात्मक) डोस मिळण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. 

काही ज्येष्ठ नागरिक हे लॉकडाऊन काळात परदेशात अडकले होते. तिथेच त्यांना लसीचे दोन डोस घ्यावे लागले. आता ते भारतात परतले आहेत. शासनाच्या निकषानुसार एप्रिल २०२१ पूर्वीच दुसरा डोस झाला आहे. त्यामुळे प्रिकॉशन डोससाठी ते  पात्र आहेत. त्यांनी तेथील कंपन्यांची लस घेतली आहे. ती भारतात सहज उपलब्ध नाही. नियमानुसार ज्या लसीचा डोस घेतला, त्यांना त्याच लसीचा डोस दिला जाणार आहे. मग आम्ही कोणत्या कंपनीचा डोस घ्यायचा?  त्यामुळे पात्र असूनही तिसरा डोस घ्यायचा तरी कसा? असा प्रश्न पडल्याचे ज्येष्ठांंनी सांगितले.  

भारतातील अनेक लोकांनी एकही डोस घेतलेला नाही, अशी नुकतीच आकडेवारी जाहीर झाली. त्या यादीत परदेशातून आलेले भारतीय आहेत. भारत सरकारने त्या-त्या देशातील सरकारशी संपर्क करून तिथे दोन डोस घेतलेल्या भारतीयांची माहिती घ्यावी आणि कोविन ॲपमध्ये समाविष्ट करावी. हा प्रश्न सरकारनेच सोडवायला हवा. सद्यस्थितीत एकमेव मार्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिक कोविन ॲपमध्ये नोंदणी करून एक आणि त्यानंतर दुसरा डोस घेऊ शकतात.- डॉ. अविनाश भोंडवे, राष्ट्रीय अधिष्ठाता,  कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स, आयएमए

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस