शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचे दोन वेगळे नियम का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 02:03 IST

विकासकामांच्या सौजन्याच्या नावाला आक्षेप; देऊळगावगाडा ग्रामस्थांचा संताप, धडा देण्याचा निर्धार

खोर : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेच्या नूतनीकरणाचे काम चालू असून, या परिसरामधील ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेचा जीर्णोद्धार करण्याचा ध्यास घेतला. तब्बल १० लाख रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेच्या घडामोडीच्या ध्यासातून आज विठ्ठलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही दौंड तालुक्यातच नव्हे, तर पुणे जिल्ह्यामध्ये उठून दिसत आहे. मात्र, याच शाळेच्या देखण्या रूपाला डाग लागला असून, ग्रामस्थांनी एक-एक लाख रुपये वर्गणी देऊन कलामंच, प्रवेशद्वार, स्टेज स्वखर्चाने बांधून दिले आहे. या बदलास या कलामंच, प्रवेशद्वार यावर सौजन्य म्हणून नाव दिले आहे.पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे हे शाळेला दिलेले सौजन्याचे नाव काढून टाका असे सांगतात, तर कलामंच, प्रवेशद्वार व नूतनीकरणाचे सुरू असलेले काम बेकायदेशीर असल्याचा दावा दौंडचे गटविकास अधिकारी गणेश मोरे करीत आहेत. मग, आमच्या शाळेचे काम बेकायदेशीर आहे, सौजन्याचे नाव काढून टाका, असे प्रशासन म्हणत आहे याला आमचा विरोध नाही;मात्र पुणे जिल्ह्यामधील सर्वच ठिकाणच्या शासकीय-प्रशासकीय व कोनशिलेवरचे सौजन्याचे नाव काढून टाका, असे मत देऊळगावगाडाचे माजी सरपंच व सौजन्याच्या नावाचे प्रमुख डी. डी. बारवकर यांनी व्यक्त केले आहे.आज पुणे जिल्ह्यात किती तरी शाळा आहेत की, प्रत्येक शाळेवरती, कोनशिलेवरती सौजन्याचे नाव देण्यात आले आहे. मग, यामध्ये पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी का जातीने लक्ष घालत नाहीत, तसेच कित्येक शाळांचे नूतनीकरणाचे काम झाले, अनेक ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात आले, तेथील बांधकामाला परवानगी घेतली का, हे आधी तपासा व मगच विठ्ठलवाडी शाळेच्या संदर्भात निर्णय द्या, असे डी. डी. बारवकर यांनी म्हटले आहे.याच देऊळगावगाडा केंद्रामधील कुसेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सन २0१६ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंतराव शितोळे हे सौजन्याच्या नावाचे उद्घाटन करतात. मग, त्यांना शासनाचे सौजन्याच्या नावासंदर्भात प्रशासकीय परिपत्रक त्यावेळी का दिसले नाही, एकाच केंद्रामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाºयाचे दोन वेगळे नियम का, असे विठ्ठलवाडी ग्रामस्थवर्गांचे म्हणणे आहे.सौजन्याची नावे शासनाच्या परिपत्रकामध्ये टाकत नाही. जिल्ह्यामधील सर्वच ठिकाणच्या शासकीय-प्रशासकीय व कोनशिलेवरचे सौजन्याचे नाव काढून टाका. मगच आम्ही आमच्या शाळेचे नाव काढून टाकू.- डी. डी. बारवकर(माजी सरपंच)आम्ही काय शोभेची बाहुली आहे काय?गटविकास अधिकाºयांनी शैक्षणिक वाढ विकासाच्या संदर्भातील सर्व अधिकार हे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांना दिले आहेत. त्यानुसारच ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर करून घेऊनच शाळा व्यवस्थापन समितीने हे बांधकाम केलेले आहे आणि आता गटशिक्षणाधिकारी गणेश मोरे हे हेच बांधकाम बेकायदेशीर असल्याचा दावा करीत आहेत. मग, आम्ही काय शोभेची बाहुली आहे काय ?- केशव बारवकरग्रामपंचायत सदस्य विठ्ठलवाडी