शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वैमनस्यातून दोन्ही काँग्रेसचे अध्यक्ष एकमेकाविरुद्ध भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:10 IST

वेल्हे तालुक्यातील अंत्रोली येथील राजकीय वैमनस्यातून दोन्ही काँग्रेसचे अध्यक्ष एकमेकाविरुद्ध भिडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस ...

वेल्हे तालुक्यातील अंत्रोली येथील राजकीय वैमनस्यातून दोन्ही काँग्रेसचे अध्यक्ष एकमेकाविरुद्ध भिडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस किरण राऊत व वेल्हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाना राऊत यांच्या गटांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही अध्यक्षांच्या विरोधात वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये एकमेकाविरुद्ध तक्रार दिलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना वेल्हे पोलिसांनी सांगितले की, अंत्रोली येथील सरपंच नवनाथ शंकर राऊत हे दुपारी एकटेच अत्रोली गावातील राजु बबन ठाकर यांचे घराकडून जखननी माता मंदिराकडे जात असताना बेकायदेशीर जमाव जमवून विद्यमान सरपंच नवनाथ शंकर राऊत यांना लाकडी बांबुने व दांडक्याने मारहाण केली. त्यावेळी त्यांना त्यांचे चुलत भाऊ दिलीप महादु राऊत व विशाल चंद्रकांत राऊत हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण करून गंभीर दुखापत केली. नवनाथ शंकर राउत यांनी दिलेली फिर्याद वेल्हा पोलीस स्टेशन येथील गुन्हा दाखल केले आहे.

तसेच संजय मोतीराम राऊत व त्याचे वडील मोतीराम राउत यांना मारहाण करुन त्यांचे घरासमोर मॅक्स गाडी फोडुन नुकसान केलेबाबत वेल्हा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, हवेली विभाग सहा. पोलीस निरीक्षक मनोज पवार वेल्हा पोलीस स्टेशन याचे व मार्गदर्शनाखाली करीत आहेत.