शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सॅलिसबरी पार्कमध्ये दोन मोटारी जाळल्या

By admin | Updated: March 20, 2017 04:40 IST

गुलटेकडी येथील सॅलिसबरी पार्कमधील संदेश सोसायटीतील दोन मोटारी अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्या. याप्रकरणी मार्केट यार्ड

पुणे : गुलटेकडी येथील सॅलिसबरी पार्कमधील संदेश सोसायटीतील दोन मोटारी अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्या. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन्ही मोटारींचे मिळून ५ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अक्षय गुप्ते (वय ३०, रा. संदेश सोसायटी, मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. गुप्ते आणि त्यांच्या काकांचा संदेश सोसायटीमध्ये बंगला आहे. ते खासगी कंपनीमध्ये नोकरीस असून, शुक्रवारी रात्री त्यांनी बंगल्याच्या पार्किंगमध्ये मोटार लावली. शेजारीच त्यांच्या काकांचीही मोटार होती. शनिवारी मध्यरात्री अचानक पार्किंगमधून धूर येऊ लागला. धुरामुळे जाग आलेल्या गुप्ते यांनी पार्किंगमध्ये पाहिले असता मोटारीने पेट घेतल्याचे दिसले. त्यांनी पाण्याचा मारा करीत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मोटारीचा पाठीमागील भाग जळून खाक झाला. तर शेजारी असलेल्या मोटारीचेही नुकसान झाले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून या मोटारी पेटवल्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पी. पी. ढवण करत आहेत.