दरम्यान, या दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मांस वाहतूक प्रकरणात आयशर चालक सुफियान शब्बीर अन्सारी (वय ३३) (रा. शिळफाटा, मुंब्रा) व अश्फाक मोहम्मद हनीफ आतार (वय ४० ) (रा. मंगळवार पेठ, जुन्नर) यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद समाजसेवक शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७) (रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी दिली आहे.
गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार :वारुळवाडी गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाच्या समोर नाशिक ते पुणे रोडवरून टेम्पोमधून पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना गोमांस नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून टेम्पो (नं. एम एच १४ एच जी २४०९ ) ची तपासणी केली असता वाहनात अंदाज वजन ३५०० किलो गोमांस मिळून आले. याप्रकरणी तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कोकणे हे करीत आहेत.