शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्डे दरोड्यातील दोघांना अटक

By admin | Updated: June 16, 2016 04:13 IST

सहा महिन्यांपूर्वी कर्डे (ता. शिरूर) येथील दावल मलिक वस्तीवर झालेल्या खुनासह दरोडा या गुन्ह्यातील सहापैकी दोन आरोपींना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या

शिरूर/ लोणी काळभोर : सहा महिन्यांपूर्वी कर्डे (ता. शिरूर) येथील दावल मलिक वस्तीवर झालेल्या खुनासह दरोडा या गुन्ह्यातील सहापैकी दोन आरोपींना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. उर्वरित चार आरोपींना लवकरच अटक करू, असा विश्वास पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी व्यक्त केला. या संदर्भात बाळू प्रभाकर चव्हाण (वय २५) व अमोल दुर्योधन ऊर्फ दुर्या काळे (वय २३, दोघेही राहणार खोकडमळा, आलेगाव पागा, ता. शिरूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ५ डिसेंबर २०१५ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहा अज्ञात आरोपींनी मच्छिंद्र रामभाऊ बांदल (वय ४५) यांच्या घरी दरोडा टाकला होता. मच्छिंद्र बांदल, त्यांची पत्नी शारदा (वय ४०) व मुले दीपक व नवनाथ (वय १९) या चौघांना कोयता, चाकू, लाकडी दांडके व सुरा यांच्या साहाय्याने दमदाटी करून जबरदस्त मारहाण केली होती. तसेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ८७ हजार ७० रुपयांचा किमती ऐवज चोरून नेला होता. मच्छिंद्र बांदल यांच्या डोक्याच्या कवटीला गंभीर मार लागल्याने ते आठ दिवस बेशुद्धावस्थेत होते. १२ डिसेंबर रोजी ते मरण पावले. परिसरातील नागरिकांनी शिरूर चौफुला येथे रास्ता रोको आंदोलनही केले होते. (वार्ताहर)असा लागला तपास कुठलाच पुरावा नसल्याने या पोलीस पथकाने पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये जोरदार तपास केला. त्या वेळी बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, आलेगाव पागा येथील घरफोडी करणारे दोघेजण कामधंदा न करता दारू व गांजा पिऊन दररोज मौजमजा करत आहेत. पोलीस पथकाने भिक्षेकरी, फेरीवाला, कपडेविक्रेता, शेतकरी असे वेगवेगळे वेषांतर करून या दोघांची माहिती गोळा केली. त्या वेळी या दोघांकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यांचे फोटो मिळवून फिर्यादी शारदा बांदल यांना दाखवले असता या दोघांना ओळखले. त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे चार साथीदारही निष्पन्न झाले असून, लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती राम जाधव यांनी दिली.