शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षिकेची मारहाण

By admin | Updated: December 23, 2016 01:06 IST

इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होऊन महिना होत नाही, तोच सिंहगड रस्त्यावरील एका शाळेत ‘प्ले ग्रुप’ला प्रवेश घेतलेल्या अडीच

पुणे : इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होऊन महिना होत नाही, तोच सिंहगड रस्त्यावरील एका शाळेत ‘प्ले ग्रुप’ला प्रवेश घेतलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला शिक्षिकेकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.घरात व अंगणात हसण्याखेळण्याच्या वयात अनेक पालक मुलांना शाळेत पाठवतात. शाळेतील वातावरणाची आणि शिक्षकांची कोणतीही चौकशी न करता, जवळच्या कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करतात. शाळेतील शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि शिक्षणाची जबाबदारी सोडून पालक मोकळे होतात. मात्र, पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील दळवीवाडी येथील एका शाळेतील शिक्षकेने गुरुवारी अडीच वर्षांच्या मुलाच्या कानाखाली मारली. या लहान मुलाच्या कानाखाली बोटांचे वळही उमटले आहेत. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पालकांनी शाळेला याचा जाब विचारला असता, प्रशासनाकडून सारवासारव केली जात आहे.पुण्यातील ट्री हाऊसच्या काही शाळा गेल्या आठवड्यात अचानक बंद पडल्या. त्यामुळे मुलांना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला. पूर्व प्राथमिक शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे या शाळेवर कारवाई करण्यास शिक्षण विभागाने हतबलता दाखवली.