पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातून मागील २५ दिवसांत तब्बल ३.९१ टीएमसी ( दशलक्ष घनमीटर) पाणी जिल्ह्यातील सिंचन, तसेच पाणी योजनांसाठी सोडले गेले. त्यामुळेत या प्रकल्पात अवघा २.७७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जून- जुलै मध्ये पावसाने ओढ दिल्यास पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावणार आहे. १५ मे रोजी या प्रणालीत ६.७१ टीएमसी पाणीसाठा होता.नोव्हेंबर २०१४ मध्ये झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत महापालिकेने दरमहा शहरासाठी सव्वा टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली होती. ती मान्यही करण्यात आली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही धरणे भरण्यास आॅगस्टचा दुसरा आठवडा उजाडत असल्याने १५ आॅगस्टपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी फेटाळत पुणेकरांना कोणत्याही पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही, असे आश्वासन देत पालिकेसाठी जुलै २०१५पर्यंतचा पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला. त्यानुसार, मागील महिन्यात १५ मेपर्यंत असलेला ६.४७ टीएमसी पाणीसाठा पाहता यंदा कपात होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
धरणांत अडीच टीएमसी पाणी
By admin | Updated: June 12, 2015 06:13 IST