शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खोटे बक्षीसपत्र बनवून दोन एकर बळकावली

By admin | Updated: March 27, 2015 23:19 IST

शिक्के बनवून खोटे बक्षीसपत्र तयार करून दोन एकर जमीन हडप करण्याचा प्रकार वडकी (ता. हवेली) येथे उघडकीस आला. हा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

लोणी काळभोर : मूळ मालक हयात असताना त्याच्या क्षेत्रास बाधा आणण्याच्या हेतूने बनावट बक्षीसपत्राचा दस्तऐवज तयार करून व त्यासाठी लागणारे शिक्के बनवून खोटे बक्षीसपत्र तयार करून दोन एकर जमीन हडप करण्याचा प्रकार वडकी (ता. हवेली) येथे उघडकीस आला. हा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. विशाल सुरेश आगरवाल (रा.२७, सोमवार पेठ, कपूर हाईट्स, माळीमहाराज मठाजवळ, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फसवणुकीचा हा प्रकार दलप्रताप सूर्यभानसिंग ठाकूर (वय ११ वर्षे, रा. ८२१, चिंतामणी हॉस्पिटलजवळ, पुणे), मयूर उत्तम मोडक (वय २२, रा. वडकी) व वडकी गावचे कोतवाल नामदेव बाबूराव शिंदे यांनी केला आहे. तिघांपैकी मयूर मोडक याला अटक करण्यात आली आहे. सुरेश आगरवाल यांचे वडील सुरेश बाबूलाल आगरवाल, त्यांचे नातेवाईक रमेशचंद्र शिवविलास तिवारी (रा. ५२०, रास्ता पेठ, पुणे) व अमरजितसिंग मानसिंग कौचर (रा. ९४५, रविवार पेठ पुणे) या तिघांनी १९९८ साली वडकी गावातील जमीन गट क्रमांक १२५३ क्षेत्र १ हेक्टर ५३ आर पैकी ८० आर (दोन एकर) क्षेत्र चंद्रकात गेणबा मोडक व इतर सहा जणांकडून कायदेशीर खरेदीखत करून विकत घेतले होते. त्यानंतर सुरेश आगरवाल हे १ मे २०११ रोजी मयत झाले. परंतु, त्यांच्या मुलांनी वारसाहक्काने त्यांची नोंद केलेली नव्हती. सुरेश आगरवाल हे दि. ४ मार्च २०१५ रोजी बुधवार पेठ येथील आपल्या दुकानात होते. त्या वेळी पोस्टमनने त्यांच्या वडिलांचे नाव असलेले रजिस्टर टपाल दिले. त्यामधे सुरेश आगरवाल, रमेशचंद्र तिवारी, अमरजितसिंग कोचर यांनी दलप्रताप ठाकूर यांना १३ एप्रिल १९९९ रोजी बक्षीसपत्र करून दिलेल्या दस्ताबाबत तुमची काही तक्रार असल्यास तुम्ही सात दिवसांच्या आत हरकत घ्यावी, असे नमूद करण्यात आले होते.सदर नोटीस मिळताच ७ मार्च रोजी हवेलीच्या तहसीलदारांचेपत्र घेऊन आगरवाल हे तिवारी व कोचर यांचे समवेत वडकी गावच्या तलाठी पुष्पा गोसावी व कोतवाल नामदेव शिंदे यांना भेटले. त्या वेळी शिंदे यांनी त्यांच्याकडे नोंदणीसाठी आलेले बक्षीसपत्राचे दस्तऐवज पाहण्यासाठी झेरॉक्स दिली. त्यानंतर तिघांनी हडपसर मेगा सेंटर येथील हवेली सब रजिस्ट्रार आॅफिसमध्ये जाऊन बक्षीसपत्राची कायदेशीर प्रत घेतली. त्यामधे वडकी तलाठ्याकडे नोंदणीसाठी आलेले बक्षीसपत्र क्रमांक ३८३/१/९९ हे बक्षीसपत्र लिहून घेणार दलप्रताप ठाकूर हे बक्षीसपत्र खोटे असून, त्या ठिकाणी लिहून घेणार राजेंद्र महातू शितोळे (रा.कोंढवा खुर्द, मिठानगर, पुणे) व लिहून देणार सोमनाथ किसन फुल्लेलु (रा.अहमदनगर) यांची येवलेवाडी येथील जमीन गट क्रमांक ३५ हिस्सा नंबर २०/०८ क्षेत्र ०१ आर चे असलेबाबत खात्री झाली. तसेच त्यांचे बक्षीसपत्र लिहिलेला १०० रुपयांच्या स्टॅम्पवर दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ३, दशरथ एल. शिंदे, पुणे जिल्हा रजिस्टर नंबर ९०८४ व क्रमांक ५७ मुख्य महानगर दंडाधिकारी मुंबई दि. १३/४/९९ असे वेगवेगळ्या ठिकाणचे शिक्के निदर्शनास आले. त्या वेळी सदर बक्षीसपत्र बनावट व खोटे असल्याची त्यांची खात्री झाली.या जागेच्या तीनही मूळ मालकांनी सदर जमिनीचे बक्षीसपत्र अद्याप कोणत्याही व्यक्तीस दिलेले नसून खोटे बक्षीसपत्र झाल्याने त्याची नोंद करण्यात येऊ नये, असा तक्रार अर्ज दिला. (वार्ताहर)बक्षीसपत्र कसे प्राप्त झाले, याबाबत वडकीच्या तलाठ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी कोतवाल नामदेव शिंदे याच्याकडे त्यांच्या ओळखीचा मयूर मोडक याने दिले व त्यावरून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला असल्याचे त्यांनी सांगितले.