शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

तमाशापंढरीत अडीच कोटींची उलाढाल

By admin | Updated: April 9, 2016 01:50 IST

या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तमाशा बुकिंगवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र, गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवारी दिवसभरात २२५ हून अधिक सुपाऱ्या तमाशा खेळाच्या गेल्या

नारायणगाव : या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तमाशा बुकिंगवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र, गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवारी दिवसभरात २२५ हून अधिक सुपाऱ्या तमाशा खेळाच्या गेल्या असून, अडीच कोटी रुपयांची उलाढाल या तमाशा पंढरीत झाली़, अशी माहिती लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, मा. वल्लभ बेनके तमाशानगरीचे (पंढरी) अध्यक्ष गणपत कोकणे, उपाध्यक्ष अन्वर पटेल यांनी दिली़ लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कलापंढरीत गुढीपाडव्यानिमित्त तमाशाची सुपारी देण्यासाठी राज्यातून गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आल्याने तमाशापंढरीत यात्रेचे रूप आले होते. आपल्या गावातील यात्रेनिमित्त तमाशाची सुपारी देण्यासाठी गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ येथील ३३ राहुट्यांमध्ये आले होते. दिवसभरात २२५ हून अधिक तमाशा कार्यक्रमांच्या सुपाऱ्या गेल्या आहेत. जवळपास २ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल या तमाशापंढरीत झाली आहे. तमाशा ठरविताना तमाशात कलाकार किती, महिला कलावंत किती, वग कोणता, गावी किती होणार याची प्रामुख्याने विचारणा गावपुढाऱ्यांकडून होत होती. कालाष्टमी व पौर्णिमा या दिवसांसाठी तमाशा खेळाला जास्त मागणी होती़मोठ्या फडमालकांना दिवसभरात ११ ते १५ सुपाऱ्या मिळाल्या. तर मध्यम आणि छोट्या फडाचे ५ ते ८ सुपाऱ्या गेल्या. राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने त्याचा फटका तमाशा बुकिंगला बसेल असे वाटत असताना सर्वच फडमालकांना यंदाचे वर्ष बऱ्यापैकी गेले. तमाशा फडमालकांच्या दृष्टीने पौर्णिमा व कालाष्टमी या दिवसांना विशेष महत्त्व असून, या तारखांना लोकनाट्य तमाशा खेळाची सुपारी सर्वाधिक किमतीची मिळते़ या वर्षी सर्वाधिक सुपारी भिका-भीमा यांची गेली. त्यांची पौर्णिमेची सुपारी ३ लाख २१ हजारांना गेली. मंगला बनसोडे यांची पौर्णिमा २ लाख ६१ हजाराला आणि कालाष्टमी २ लाख ७५ हजाराला, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर पौर्णिमा २ लाख २५ हजारांना आणि कालाष्टमी २ लाख ४५ हजाराला गेली. मालती इनामदार पौर्णिमा २ लाख १ हजाराला आणि कालाष्टमी २ लाख १ हजाराला, चंद्रकांत ढवळपुरीकरसह किरणकुमार ढवळपुरीकर पौर्णिमा २ लाख १ हजाराला आणि कालाष्टमी २ लाख १ हजाराला, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर पौर्णिमा १ लाख ८१ हजाराला, अंजली नाशिककर पौर्णिमा १ लाख ६० हजाराला गेली. काळू नामू वेळवंडकरसह अमन तांबे पुणेकर पौर्णिमा २ लाख ५१ हजाराला आणि कालाष्टमी २ लाख ११ हजाराला यांच्यासह जगनकुमार वेळवंडकर, विनायक महाडिक, आनंद लोकनाट्य जळगांवकर, हरिभाऊ बढे नगरकर, काळू-बाळू , दत्ता पुणेकर, संध्या माने सोलापूरकर, रवींद्र खोमणे औरंगाबादकर, जगनकुमार वेळवंडकर, लता पुणेकर यांच्या सुपाऱ्या गेल्या, अशी माहिती संजय अडसरे यांनी दिली़.