शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सव्वातीनशे जण स्वेच्छानिवृत्त

By admin | Updated: April 22, 2015 05:37 IST

येथील टाटा मोटर्स कंपनीतील विविध विभागांतील ३२५ कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) स्वीकारली. व्हीआरएस घेण्याबाबत कामगारांवर

पिंपरी : येथील टाटा मोटर्स कंपनीतील विविध विभागांतील ३२५ कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) स्वीकारली. व्हीआरएस घेण्याबाबत कामगारांवर सक्ती केली जात असल्याचा आरोप कामगारांनी कंपनी व्यवस्थापनावर केला होता. व्यवस्थापनाच्या लेखी आश्वासनानंतर हा वाद निवळला होता. वाहनउद्योगातील मंदीमुळे, तसेच वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीच्या उत्पादनात घट झाली आहे. टाटा मोटर्सच्या देशभरातील धारवाड, जमशेदपूर या प्रकल्पांसह पिंपरी येथील कंपनीत कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू करण्यात आली आहे. याची नोटीस फेब्रुवारीअखेरीस कंपनीत लावण्यात आली होती. कंपनीत ६ हजारांपेक्षा अधिक कायमस्वरूपी कामगार आहेत. त्यांतील ४० वर्षांपुढील कामगारांना व्हीआरएसची योजना लागू केली होती. बहुसंख्य कामगार हे ४० वर्षांवरील आहेत. वारंवार गैरहजर राहणे, शारीरिक तंदुरुस्तीच्या अभावासह वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण ३२५ कामगारांनी व्हीआरएस योजना स्वीकारली. त्यातील सर्वाधिक कामगार कमर्शिअल व्हेईकल प्रॉडक्शन विभागातील आहेत. वय वर्षे ४० ते ५०, ५० ते ५५, ५५ ते ६० या वयोगटांनुसार व्हीआरएसचे लाभ दिले जाणार आहेत. योजनेची मुदत १८ एप्रिल रोजी संपली. कंपनीच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्हीआरएस लवकरच जाहीर होणार आहे. या संदर्भात व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संबंधित अधिकारी सुटीवर वा शहराबाहेर असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.(प्रतिनिधी)