पिरंगुट : बावधन गण हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या गणात बावधन बुद्रुक, भूगाव, भुकूम, लवळे, सूस ही ५ मोठी गावे आहेत. या गणात राष्ट्रवादीकडून जीवन कांबळे, शिवसेनेकडून विजय केदारी, भाजपाकडून लहू चव्हाण, काँग्रेसकडून प्रल्हाद निकाळजे, तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून नीलेश ननावरे रिंगणात आहेत. या गणात राष्ट्रवादीच्या माजी उपसभापती सविता पवळे विजयी होऊन राष्ट्रवादीने ताकद दाखवून दिली होती. तर, भाजपाचे लहू चव्हाण हे तीन ते चार वेळा मतदारांपर्यंत पोहोचले आहेत. भुकूम व लवळे गावांत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे; त्यामुळे त्याचा फायदा शिवसेनेला होईल.पिरंगुट गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. पिरंगुट गावात मतदारांची संख्या जास्त आहे. या गणात राष्ट्रवादीचे विद्यमान सभापती महादेव कोंढरे यांच्या पत्नी राधिका कोंढरे, तर शिवसेनेचे माजी सभापती बाळासाहेब पवळे यांच्या पत्नी संगीता पवळे याचबरोबर भाजपाकडून विमल मारणे, काँग्रेसकडून नंदा मारणे, भारिप बहुजन महासंघाकडून लीलाबाई मरगळे, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला मारणे यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत.
बावधन-पिरंगुट गटात रंगणार चौरंगी लढत
By admin | Updated: February 14, 2017 01:41 IST