शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भोरमध्ये रंगणार चौरंगी लढत

By admin | Updated: June 28, 2014 23:03 IST

दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढणार की यंदाच्या वेळीही राष्ट्रवादी कॉँग्रेसचा छुपा उमेदवार असणार, यावर भोर मतदारसंघाची समीकरणो अवलंबून आहेत.

भोर : दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढणार की यंदाच्या वेळीही राष्ट्रवादी कॉँग्रेसचा छुपा उमेदवार असणार, यावर भोर मतदारसंघाची समीकरणो अवलंबून आहेत. नव्याने वाढलेले तरुण मतदार व मोदीलाटेचा प्रभाव यामुळे युतीच्या कार्यकत्र्यात उत्साहाचे वातावरण आहे. आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य  आघाडीला धोक्याची घंटा आहे. युतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच असून आघाडी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना  व अपक्ष अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
भोर, वेल्हे, मुळशी असे तीन तालुके मिळून हा मतदारसंघ बनला आहे. या तीनही तालुक्यांतील  ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढतात. आरोप-प्रत्यारोप, वादविवाद होतात. निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार आघाडी करतात. मात्न, कार्यकत्र्याच्या मनातील सल जात नाही आणि निवडणुकीत उलट परिणाम होतो,  त्यामुळे नेत्यांचे मनोमिलन, कार्यकत्र्याचे वैर कधीच मिटत नाही. 
भोरची जागा कॉँग्रेसकडे आहे. मात्र, 2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोघांनी बंडखोरी केली. कॉँग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी होऊन एकाची बंडखोरी झाली. राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराला पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबाही होता, अशी चर्चा होती. दोन बंडखोरांत झालेल्या मतांच्या विभाजनामुळे संग्राम थोपटे यांचा विजय सुकर झाला, अन्यथा वेगळे चित्र दिसले असते. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका बाहेरून आणि आतूनही काय राहते, याकडे लक्ष आहे. याचे कारण म्हणजे जिल्ह्यातील इंदापूर वगळता केवळ भोरचीच जागा कॉँग्रेसच्या वाटय़ाला आहे. या दोन्हीही ठिकाणी राष्ट्रवादीकडून बंडखोरीची परंपरा आहे. 
नवीन वाढलेले 42 हजार मतदार व ‘मोदी फॅक्टर’ यामुळे युतीचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. उमेदवारीसाठी माजी आमदार शरद ढमाले व जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांच्यात स्पर्धा आहे. कॉँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे हेच  एकमेव इच्छुक आहेत. मात्न, राष्ट्रवादीकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, शांताराम इंगवले, राजेंद्र हगवणो, मानसिंग धुमाळ, रघुनाथ किंद्रे, चंद्रकांत बाठे अशी नावे आहेत. मनसेची फारशी ताकद राहिलेली नाही. विरोधकांची ताकद फारशी नसली तरी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी आणि ऐनवेळी अपक्षाच्या रूपाने बंडखोरी यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. (वार्ताहर)