शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तास पाणीपुरवठा मार्गी

By admin | Updated: May 7, 2016 05:12 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी आणि प्रकल्पाची पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या २०७ कोटींच्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी आणि प्रकल्पाची पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या २०७ कोटींच्या खर्चाला अखेर स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. या प्रकल्पाच्या निविदाप्रक्रियेबाबत स्पर्धा झाली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते. शहराला समान पाणीपुरवठा करण्यासाठी २४ तास पाणी पुरविणे गरजेचे असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. सरकारने पहिल्या टप्प्यात शहराच्या ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प प्रस्ताव मंजूर केला आहे.केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी १४३ कोटी १७ लाख रुपये मंजूर केले आहेत. परंतु, त्यामध्ये प्रकल्पाची देखभाल-दुरुस्ती करण्याच्या कामाचा समावेश नाही. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहराच्या ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प दोन वर्षांत राबविण्यासाठी आणि या प्रकल्पाचे पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी निविदा मागविली होती. (प्रतिनिधी)निविदाप्रक्रियेचा वाद या प्रकल्पाच्या निविदाप्रक्रियेत स्पर्धा झाली नसल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्याच सदस्यांनी केला. प्रशासनाने ठरावीक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा काढली. त्यात स्पर्धा झाली नाही, असाही आरोप झाला. अखेर शुक्रवारी या विषयाला मंजुरी देण्यात आली.विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराने २०७ कोटी ५८ लाख २९ हजार ४२४ रुपयांची व एसपीएमएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या ठेकेदाराने ३१६ कोटी ९२ लाख ३७ हजार ९१६ रुपयांची निविदा सादर केली आहे. यामध्ये कमी दराची निविदा सादर केलेल्या विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराला शहराच्या ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याची मान्यता दिली.