पुणो : ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी गेल्या चोवीस तासात आठ महिलांच्या गळ्यातील 5 लाख 62 हजारांचा ऐवज हिसकावला. दिवाळीच्या दिवसात सक्रीय झालेल्या सोनसाखळी चोरट्यांमुळे महिलांच्या मनात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चतु:शृंगी देवीचे पतीसह दर्शन घेऊन मंदिराच्या पायथ्याजवळ असलेल्या विश्रमबाग सोसायटीसमोरून पायी जात असतानाच 35 वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण, मंगळसूत्र असा एकूण 53 हजारांचा ऐवज हिसकावण्यात आला.
खराडी रस्त्यावरील निलम कॉम्प्लेक्स समोरअशीच घटना घडली. त्यानंतर साडेआठच्या सुमारास कात्रज येथील सिक्स्थ सेन्स सोसायटीसमोर 56 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 9क् हजारांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. रात्री दहाच्या सुमारास सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलच्या समोर 57 वर्षीय महिलेचे
मंगळसूत्र व सोन्याची माळ असा एकूण 1
लाख 95 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला.
ही महिला पतीसह दुचाकीवरून जात असतानाच मोटारसायकलवरील चोरटय़ांनी ऐवज हिसकावला.(प्रतिनिधी)
4कोथरुड येथील बकुळ सोसायटीकडे जाणा-या रस्त्यावर चोरट्यांनी सदाशिव पेठेत राहणा-या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 35 हजारांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. तर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पिनाक मेमरी सोसायटीमध्ये 35 वर्षीय महिलेचे 5क् हजारांचे मंगळसुत्र हिसकावण्यात आले. ही महिला सोसायटीच्या लिफ्टमध्ये जात असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांपैकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.