शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस गावांना अल्पदरात शुद्ध पाणी

By admin | Updated: March 27, 2016 02:57 IST

क्षारयुक्त व दूषित पाण्यापासून मुक्तता मिळावी म्हणून निरगूडसर गावात सुरू केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून २५ गावांना आता शुद्ध पाणी मिळत आहे. या माध्यमातून अवघ्या

निरगुडसर : क्षारयुक्त व दूषित पाण्यापासून मुक्तता मिळावी म्हणून निरगूडसर गावात सुरू केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून २५ गावांना आता शुद्ध पाणी मिळत आहे. या माध्यमातून अवघ्या ५० पैसे प्रतिलिटरप्रमाणे पाणी मिळते. यासाठी एटीएमची व्यवस्था केली आहे. कार्ड मशिनला लावल्याबरोबर हवे तवढे शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होते.क्षारयुक्त व दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण झाला आहे. यातून गंभीर आजारांना अनेकांना तोंड द्यावे लागते. या समस्येतून निरगुडसर व परिसरातील नागरिकांना मुक्त करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी भीमाशंकर कारखान्याद्वारे मदत करून निरगुडसर गावात पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प ग्रामपंचायतीमार्फत चालवला जातो. तो स्वयंचलित असून यामधून ताशी अडीच हजार लिटर पाणी उपलब्ध होते. यातील खराब क्षारयुक्त पाणी सायफनद्वारे झाडांना सोडले जाते. या पाण्यावर गावच्या शाळेमागे सुंदर हिरवीगार झाडी वाढली आहे. ग्रामस्थांना एटीएम कार्ड देण्यात आली आहेत. या कार्डवर शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येते. एकट्या निरगुडसरच नाही तर आजूबाजूच्या गावातील लोक येथूनच पाणी नेतात. घरगुती वापराबरोबरच लग्नसमारंभाला देखील पाणी येथून नेले जाते. सध्या कडक उन्हाळ््यातही निरगुडसर व परिसरातील गावांना शुद्ध व थंड पाणी मिळत आहे. ज्यांना शक्य नाही त्यांना घरपोच पाणीपुरवठा करण्याची व्यवस्थादेखील ग्रामपंचायतीने केली आहे. याचा फायदा लोकांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. किडनी व मुतखड्यासारखे आजार कमी झाले आहेत. गावचे उपसरपंच रामदास वळसे व ग्रामस्थांनी हा प्रकल्प यशस्वी करून एक आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. त्यामुळेच अवसरीबरोबर अनेक गावे पाणीशुद्धीकरण प्रकल्प सुरू करीत आहेत. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरलाघरात लागणारे पाणी महिलांनी हंडे डोक्यावर घेऊन वाहायचे, अशी पूर्वापार रीत चालत आली आहे, मात्र निरगुडसर गावात पुरुषच पाणी वाहतात. गावातील पुरुष मंडळी सायकल, मोटारसायकलीवर पाण्याचे जार घेऊन येतात व एटीएम कार्ड मशिनला लावून आवश्यक तेवढे शुद्ध व थंड पाणी घेऊन जातात. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून निरगुडसर गावातील महिलांना पाणी वाहावे लागत नाही.